Onion Export : पाकिस्तानला कांदा, टोमॅटो निर्यात सुरु करा

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानमध्ये कांद्याचे दर ४०० रुपये प्रति किलो व टोमॅटोचे दर ५०० रुपये झाले आहेत. हे दर ७०० रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Onion Export
Onion ExportAgrowon
Published on
Updated on

पुणेः पाकिस्तानमध्ये कांद्याचे दर (Onion Rate In Pakistan) प्रचंड वाढले आहे. त्यामुळे भारतातून कांदा आणि टोमॅटोची आयात (ONion Tomato Import From India) करण्याची मागणी होत आहे. भारताने तातडीने निर्यात (Tomato Onion Export To Pakistan) सुरू करून भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक (Onion Tomato Farmer) शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी केली. घटवट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री यांना पत्र पाठवून आपली मागणी केली .

Onion Export
Onion Rates:चाळीतील कांदा मोजतोय अखेरची घटका

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानमध्ये कांद्याचे दर ४०० रुपये प्रति किलो व टोमॅटोचे दर ५०० रुपये झाले आहेत. हे दर ७०० रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग भारतातून कांदा व टोमॅटो आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहेत.

Onion Export
Onion Market: कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात का?

भारतात मात्र कांद्याचे व टोमॅटोचे दर अद्यापही उत्पादन खर्चपेक्षा कमी आहेत. कांदा चाळींमध्ये सडतो आहे. तर टोमॅटो रस्त्यावर फेकले जात आहेत. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा व टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.

भारतात कांदा व साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारताने पाकिस्तानातून कांदा व साखरेची आयात केली आहे. सीमेवर कारगिलचे युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आली होती. भारताने पाकिस्तानला मदत करण्याचा हेतूने नव्हे तर भारतातील कांदा व टोणॅटो उत्पादक शेयकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्यात सुरू करावी, असे अनिल घनवट यांनी पत्रात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com