Kardai Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Crisis : हेर शिवारातील करडईचे पीक पाण्याअभावी संकटात

Kardai Farming : उदगीर हेर व परिसरात करडईची शेती बहरली आहे. लाल-पिवळ्या फुलांनी शेती लक्ष वेधून घेत आहे. परंतु पाण्याअभावी आता बहरातील पीक संकटात सापडले आहे.

Team Agrowon

Latur News : उदगीर हेर व परिसरात करडईची शेती बहरली आहे. लाल-पिवळ्या फुलांनी शेती लक्ष वेधून घेत आहे. परंतु पाण्याअभावी आता बहरातील पीक संकटात सापडले आहे. त्यामुळे यंदा उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

हेर परिसरातील लोहारा, डिग्रस, वायगाव, सताळा, शंभू उमरगा नरसिंगवाडी, नायगाव, कुमठा खुर्द, गंगापूर, करखेली, करवंदीसह अनेक गावांमध्ये करडईचे पीक काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. करडईपासून तयार केलेले तेल शेतकरी वर्षभर वापरत होते

काही शेतकरी घाण्याद्वारे तेल काढणाऱ्यांना करडई विकत होते. त्यामुळे शुद्ध करडईचे तेल ही सहज उपलब्ध होत होते. तेल काढल्यानंतर उरलेल्या चौथ्यापासून जनावरांसाठी पेंड मिळत होती. कालांतराने ज्वारी व हरभरा पिकात आंतरपीक म्हणून करडई पीक घेऊ लागले, मात्र खळे करणारे शेतमजूर मिळेनासे झाले.

हळूहळू हे पीक घेणे बंद झाले. त्यातच यावर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा प्रश्‍न आहे. सध्या पाणी उपलब्ध असलेल्या शेतातील करडईचे पीक बहरात आहे. शिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सोयाबीन काढणीनंतर रिकाम्या झालेल्या शेतात पेरलेले करडईचे पीक फुलोऱ्यात आहे. लाल-पिवळ्या फुलांनी करडईची शेती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

मात्र अनेक ठिकाणी पाण्याअभावी पीक वाळून जात आहे. यंदा या पिकातून अत्यल्प उत्पादन मिळण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. करडईला सहा हजार सहाशे ते सात हजार पाचशे रुपये क्विंटलच्या जवळपास भाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: ...तर यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता : नितीन गडकरी

Post Harvest Technology: शेतीमाल प्रक्रिया, मूल्यवर्धनासाठी ‘आंतरराष्ट्रीय केंद्र’ उभारणार : पणनमंत्री जयकुमार रावल

Safflower Production: साताऱ्यातील अशोक लाड करडई उत्पादनात राज्यात प्रथम

Fodder Shortage: राज्यात चारा टंचाई टाळण्यासाठी परराज्यांत चारा पाठविण्यावर निर्बंध

Farmers Protest: उजनी प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

SCROLL FOR NEXT