Kardai Cultivation : जिरायती भागासाठी वरदान करडई

Aslam Abdul Shanedivan

करडई वरदान

जिरायती भागात कोणती शेती करावी असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला असेल. तर ही माहिती आपल्यासाठी. अनेक ठिकाणी दिसणारी करडई मात्र दुर्मीळ होत चालली झाली आहे. हीच करडई जिरायती भागासाठी वरदान आहे.

Kardai Cultivation | Agrowon

१२०० हेक्टरवर करडई

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात अनेक वर्षांपासून याच करडईसाठी शेतकऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. ज्यामुळे तालुक्यात करडईचे क्षेत्र सुमारे १२०० हेक्टरवर विस्तारले आहे.

Kardai Cultivation | Agrowon

रब्बी हंगामातच करडई

रब्बी हंगामात पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच करडई पिक येतं. ती तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडील काळात करडई दुर्मीळ होत चालली असतानाच सोलापुरातील जिरायती पट्ट्यात याची लागवड होत आहे.

Kardai Cultivation | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात करडईचे उत्पादन

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सांगोल्याच्या काही भागांतील मोठ्या प्रमाणात करडईचे उत्पादन घेतले जाते.

Kardai Cultivation | Agrowon

नवे वाण

एसएसएफ-७०८ आणि एसएसएफ १२-४० हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पीबीएनएस- १२, ८६ हे वाण शेतकरी घेतात. सर्वसाधारणपणे प्रति झाडाला ३० ते ४० बोंडे लागतात. तर शेंडा खुडणीनंतर ७० ते ८० पर्यंत बोंडांची संख्या होते.

Kardai Cultivation | Agrowon

उत्पादन

कृषी विभागाने सुचविलेले व्यवस्थापन, तीन फवारण्या व हवामानाची साथ यातून एकरी पाच ते सहा क्विंटलचे उत्पादन साडेआठ ते नऊ क्विंटलपर्यंत जाऊ शकते.

Kardai Cultivation | Agrowon

क्विंटलला दर

करडईसाठी मंगळवेढा बाजारपेठ आहे. अलीकडील काळात क्विंटलला साडेतीन हजारांपासून चार ते पाचहजार रुपयांपर्यंत दर आला आहे.

Kardai Cultivation | Agrowon

जिरायतीसाठी वरदान

करडई शेती जिरायतीसाठी वरदान ठरत असून साडेचार महिन्यातच हे पीक येत असल्याने उत्पादन चांगले मिळण्यासह क्विंटलला चाहरजार, ५१०० ते कमाल सहाहजार रुपयांपर्यंत दर मिळतो.

Kardai Cultivation | Agrowon
Paddy Crop | Agrowon