Chandrashekhar Bawankule Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrashekhar Bawankule: जिवंत सात-बारा मोहीम राज्यभर; महसूलमंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा!

7/12 Land Record Update: महाराष्ट्रात वारसदारांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यावर तोडगा म्हणून राज्य सरकारने ‘जिवंत सात-बारा’ मोहीम जाहीर केली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगाने मिळावेत यासाठी जिवंत सात-बारा मोहीम राज्यभर राबविण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी (ता. २४) केली. मृत खातेदारांची नावे कमी होऊन वारसांच्या नावे सात-बारा करण्याची मोहीम राबविण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.

जिवंत सात-बारा मोहिमेबाबत त्यांनी निवेदन केले. या विषयावर आमदार रणधीर सावरकर, भास्कर जाधव आणि प्रशांत बंब यांनी सहभाग नोंदवत सूचना केल्या. महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, ‘‘वारस नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक वर्षे दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

अनेक वेळा मृत खातेदारांच्या नावावरच जमिनी राहतात, त्यामुळे त्यांच्या वारसांना मालकी हक्क मिळवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्याने शेतकरी त्रस्त होतात.

‘जिवंत सात-बारा’ मोहीम महसूल विभागाची पारदर्शकता वाढवणारी आणि लोककल्याणकारी ठरणार आहे. यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्वरित निर्णय घेता येतील, वेळ आणि पैशाची बचत होईल आणि वारसदारांना त्यांच्या हक्काची जमीन पटकन मिळेल. ही मोहीम शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी असून, महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोठा बदल घडवून आणेल.’’

अशी असणार मोहीम

- महसूल विभागाकडून स्वतःहून वारसांची नोंद करण्यात येईल

- अर्जदाराने अर्ज न करता महसूल यंत्रणा पुढाकार घेईल

- मृत व्यक्तींची नावे सात-बारावरून कमी करून वारसांची नोंद केली जाईल

- ही संपूर्ण प्रक्रिया फक्त दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे

बुलडाण्यातील प्रयोगाची राज्यभर अंमलबजावणी

बुलडाणा जिल्ह्यातील यशस्वी प्रयोग पाहून राज्य शासनाने १९ मार्च २०२५ रोजी निर्णय घेत संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम १ एप्रिल, २०२५ पासून राबवण्याचा आदेश दिला आहे. या अंतर्गत महसूल विभागाकडून प्रत्येक गावातील नोंदींचे अद्ययावतीकरण केले जाईल. तहसीलदार स्तरावरच वारसा हक्क निश्चित केला जाणार असून सक्सेशन सर्टिफिकेटची गरज लागणार नाही. प्रकल्पासाठी स्थानिक आमदार, महसूल अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा संयुक्तपणे काम करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Agri Exhibition: छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन नऊ जानेवारीपासून

Mango Season: हापूस यंदा एकाच टप्प्यात

Pomegranate Export: डाळिंब निर्यातीला प्रोत्साहन देणार : पणनमंत्री रावल

Maize Production: रब्बीत मक्याच्या क्षेत्रात मोठी वाढ

Bangladesh Rice Procurement: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार

SCROLL FOR NEXT