Animal Husbandry Department : "पशुसंवर्धन विभागाची तीन एकर जमीन महसूल विभागाकडून अखेर परत"

Government Decision : गोरेगावमधील पशू व मस्त्य विज्ञान विद्यापीठाची अत्यंत मोक्याची तीन एकरची जागा मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय महायुती सरकारने अखेर मागे घेतला आहे.
Animal Husbandry Department
Animal Husbandry Department Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : गोरेगावमधील पशू व मस्त्य विज्ञान विद्यापीठाची अत्यंत मोक्याची तीन एकरची जागा मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय महायुती सरकारने अखेर मागे घेतला आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या आग्रहाखातर ही जमीन देण्यात आली होती. मात्र विरोध झाल्यानंतर त्या जागेऐवजी प्रतीक्षानगर येथील आरक्षित जागा देण्यात आली.

मुंबै सहकारी बँकेच्या सहकार भवनासाठी गोरेगाव येथील पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची तीन एकर जागा देण्याचा निर्णय शासन आदेशाद्वारे घेण्यात आला होता. मात्र हा आदेश अवघ्या काही तासांत संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला. हा आदेश प्रसिद्ध करू नये यासाठी महसूल विभागातील यंत्रणा पशुसंवर्धन विभागात खेटे मारत होती.

Animal Husbandry Department
Revenue Department : धाराशिव ‘दुग्धविकास’ची एकरभर जागा ‘महसूल’कडे

या प्रकरणाची फाइल आपल्या ताब्यात द्यावी यासाठीही महसूलमधील काही अधिकारी आग्रही होते. ही जागा महसूल विभागाकडे हस्तांतर करताना काढण्यात येणाऱ्या आदेशात मुंबै बँकेचा उल्लेख करू नये यासाठी दबाव आणला गेला. मात्र पशुसंवर्धन विभागाची जागा कोणत्या कारणासाठी महसूल विभागाकडे हस्तांतर करायची याचे ठोस कारण दिल्याशिवाय प्रक्रिया राबविता येणार नाही, असे कळविले होते.

Animal Husbandry Department
Department of Animal Husbandry : पशुसंवर्धन विभागाच्या तीन एकर जागेवर डल्ला

शिवाय या जागेच्या मोबदल्यात देण्यात येणारे १०० कोटी रुपये महसूल विभागाने, की मुंबै बँकेने पशुसंवर्धन विभागाला द्यायचे याबाबत संदिग्धता होती. राज्य सरकारने आदेश काढून ही जागा मुंबई सहकारी बँकेला देण्याचा शासन आदेश काढला होता. ही जागा वाटप करताना शिक्षण आणि संशोधन हा उद्देश अनिवार्य करण्यात आले होते. महाविद्यालयात भविष्यातील शैक्षणिक, संशोधन आणि अभ्यासक्रमेतर उपक्रमांमध्ये अडथळा येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले होते.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या नावावर गोरेगावमधील तीन एकर जमीन मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी महसूल व वन विभागास प्रत्यार्पित करण्यास मान्यता दिली होती. पण हा निर्णय रद्द केल्याचे नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com