Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा बुधवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास ८९. ६० टक्क्यांवर पोहोचला. शिवाय नगर, नाशिक भागातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदीपात्राद्वारे पाण्याचा येवा वाढल्याने जायकवाडी प्रकल्प झपाट्याने ९० टाक्यांच्या पुढे जाण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे.
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २६३४.९३८ दलघमी पाणीसाठा झाला होता. तो दुपारी १२ वाजता २६५१.८१ दलघमी वर पोहचला. सकाळी ६ वाजता प्रकल्पामध्ये १८९६.८३२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला होता. तो दुपारी १२ वाजता १९१३.७०४ दलघमीवर जाऊन पोहोचला होता.
बुधवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजताच्या सुमारास प्रकल्पातील एकूण पाणीसाठा २६८३.२०८ क्युसेक झाला होता. तर उपयुक्त पाणीसाठा १९४५.१०२ दलघमी झाला होता. प्रकल्पातून गत काही दिवसांपासून डाव्या व उजव्या कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग केला जात होता. परंतु चार-पाच दिवसांपासून झालेल्या पावसामुळे डाव्या कालव्यातून होणारा विसर्ग थांबविण्यात आला.
त्याच वेळी उजव्या कालव्यातून माजलगाव प्रकल्पासाठी सुमारे ११०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच होता. मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास प्रकल्पात सुमारे ३३ हजार ७६१ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. ती दुपारी १२ वाजता ३१०३३ क्युसेकवर आली होती. बुधवारी सकाळी ९ वाजताच्या ठोक्याला २०१० क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, एक जूनपासून मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत प्रकल्पात सुमारे १३६६.४९ दलघमी अर्थात ४८.२५२० टीएमसी पाण्याची आवक झाली होती. जायकवाडी पाटबंधारे विभागाने ९० टक्क्यांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या पाणी साठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केले आहे.
सोबतच कोणत्याही क्षणी जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी स्तरावरून सर्व यंत्रणांना अलर्ट करण्याच्या सूचना देण्याची विनंती केलेली आहे. त्यानुसार सूचनाही निर्गमित झाल्या, असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.