Paddy Seedling  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Seedling : कृत्रिम पद्धतीने भात रोपांची निर्मिती

Sowing Delay : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने जावळी तालुक्यातील शेती पूर्णतः जलमय झाली असून ओल्या दुष्काळाची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.

Team Agrowon

Satara News : गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने जावळी तालुक्यातील शेती पूर्णतः जलमय झाली असून ओल्या दुष्काळाची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. सततच्या पावसाने तालुक्यात सोयाबीन, भुईमूग यांसह इतर कडधान्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत.

याशिवाय जावळीत पावसाळी प्रमुख पीक असलेल्या भाताची पेरणी तसेच रोपे तयार करण्याला सुद्धा पावसाचा चांगलाच फटका बसला आहे, भात रोपे तयार करण्यासाठी कोकोपीट वापरून कृत्रिम पद्धतीने रोपे बनवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जावळी तालुक्यात या वर्षी सर्वसाधारणपणे जून महिन्यात सुरू होणारा पाऊस मे महिन्यापासूनच सुरू झाला आहे. या पावसाने सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने भुईमूग पिकाची काढणी रखडल्याने खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

याशिवाय दीड महिन्याच्या काळात पावसाने हवी तेवढी उघडीप न दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग यासह इतर कडधान्य पिकांची पेरणी सुद्धा अजूनही रखडलेलीच असून पेरणी उशिरा झाली. तर त्याचा खूप मोठा परिणाम हा पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. तरीही हंगाम वाया जाऊ नये म्हणून पेरणी करायची यासाठी शेतकरी पावसाच्या उघडिपीची वाट पाहत आहेत.

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने गत काही दिवसांत थोडीशी उघडीप दिली होती. या काळात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताची रोपे तयार करण्यासाठी तरवे टाकले होते. ती रोपे सध्या लावणीयोग्य होऊ लागली आहेत.

मात्र शेतात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने या रोपांच्या लागणीला अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. परंतु बहुतांश ठिकाणी शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांना भाताची रोपे सुद्धा तयार करता आली नाहीत. याला पर्याय शोधत काही शेतकऱ्यांनी जमिनीवर प्लॅस्टिक अंथरून त्यावर कोकोपीट टाकून रोपे तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

जावली तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत १६३.४० टक्के अधिक पाऊस मे व जून महिन्यामध्ये झालेला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे भात लागणीची कामे, तसेच भात रोपवाटिकांची कामे खोळंबली आहेत. त्याचबरोबर जमिनीला वाफसा नसल्या कारणाने कुडाळ भागात सोयाबीन पिकाची पेरणी काही प्रमाणात झालेले नाही. पावसाने उघडीप दिली नाही तर सोयाबीन- कडधान्य, भुईमूग पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होईल. \
- प्रकाश राठोड, तालुका कृषी अधिकारी जावली (मेढा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

Poultry Farming: कोंबड्यांसाठी ‘स्टिंबायोटिक’ पूरक खाद्याची निर्मिती

Ranmewa Income: रानमेव्याच्या विक्रीतून घरखर्चाची बेगमी

Sugarcane Production: आडसाली, सुरू, खोडवा उसात सातत्यपूर्ण उल्लेखनीय उत्पादन

Bamboo Industry: बांबू उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना; विधानसभेत वनमंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT