Paddy Farming: पुणे जिल्ह्यात पश्चिम भागात भात रोपे टाकण्याची कामे रखडली

Monsoon 2025: चालू वर्षी मे महिन्यात अचानक पूर्वमोसमी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक गावांतील शेतकऱ्यांची शेताची रान भाजणी व भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट झाली आहेत.
Paddy Farming
Paddy FarmingAgrowon
Published on
Updated on

Pune News: चालू वर्षी मे महिन्यात अचानक पूर्वमोसमी पावसाने सुरुवात केल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक गावांतील शेतकऱ्यांची शेताची रान भाजणी व भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट झाली आहेत. त्यामुळे भविष्यात भात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली आहेत, त्यांची दोन ते तीन आठवड्यांची भात रोपे झाली आहेत. मावळ, मुळशी, भोर, राजगड, खेड, जुन्नर व आंबेगावच्या पश्चिम पट्यातील तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी धूळ वाफेवर भात पेरणी केली जाते. तर काही ठिकाणी मान्सून अगोदर येणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या ओलीनंतर अंदाज घेऊन पेरणी केली जाते.

Paddy Farming
Paddy Seed : भात बियाणे खरेदीसाठी गर्दी

मात्र, यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांना भात पेरणी करण्यासाठी संधीच मिळाली नाही. जिल्ह्यात भाताचे सरासरी ६० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी सुमारे सहा हजार हेक्टरवर भात रोपे टाकण्याची कामे झाली असली तरी अनेक ठिकाणी ही कामे बाकी आहेत. भात पट्ट्यातील तालुक्यामध्ये इंद्रायणी तांदळाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

यंदा भोर, मावळ, मुळशी भागात मुसळधार पडलेल्या पावसामुळे भात खाचरे तुडुंब भरली असून पाऊस थांबल्याशिवाय भात पेरणी करता येणार नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शिवाय भात खाचरातील पाणी कमी होणे गरजेचे आहे.भात पट्टा हा इंद्रायणी तांदळाची पंढरी म्हणून ओळखला जातो. या तांदळाबरोबरच अन्यत्ती काही जातींच्या तांदळाचे उत्पादन या ठिकाणी घेतले जाते.

Paddy Farming
Paddy Plantation : पावसामुळे पेरणीला सुरुवात

त्याचबरोबर नाचणी, वरई अशा काही प्रमुख पिकांची लागवड करण्यात येते. याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत मागणी असते. सध्या पाऊस पडत असल्याने भात रोपांची वाढ योग्य होत असून, भात लागण लवकर होईन. अशी आशा शेतकऱ्यांना आहे. या वर्षी पावसाने लवकर म्हणजे मे महिन्यातच चांगली हजेरी लावली होती.

लवकर सुरू झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली आहेत. त्यांची भात रोपांची चांगली उगवण झाली. उगवणीनंतर वाढीसाठी आवश्यक पाऊस पडत आहे. त्यामुळे भात रोपांची वाढ चांगली होत असून, अधूनमधून ऊन पडत असल्याने उन्हामुळे भातरोपे चांगली वाढत आहेत.

मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतली व भात खाचरातील पाणी कमी होताच पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकरी वर्गाची कामे सुरू केली होती. मात्र, मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी भोर, वेल्हा, मावळ, मुळशी भागात दिलासा मिळत असला तरी जुन्नर, आंबेगाव भागात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली असून भात पेरणी लांबण्याची शक्यता अधिक आहे.

यंदा अचानक मे महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने भात बियाणाची पेरणी करण्यात अडचण आली. सध्या पोषक हवामान असल्याने रोपांची वाढ योग्य होईल असे वाटते.
- रोहिदास लखिमले, प्रगतिशील शेतकरी, भोयरे, मावळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com