Cotton Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : जळगावात कापूस लागवडीत जामनेरची राहणार आघाडी

Cotton Farming : जळगाव जिल्ह्यात कापूस लागवडीत सतत घट येत आहे. २०२२-२३ मध्ये सुमारे पाच लाख ६७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. या हंगामात सुमारे पाच लाख ५५ हजार ते पाच लाख ५७ हजार हेक्टरवर लागवड शक्य आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात कापूस लागवडीत सतत घट येत आहे. २०२२-२३ मध्ये सुमारे पाच लाख ६७ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. या हंगामात सुमारे पाच लाख ५५ हजार ते पाच लाख ५७ हजार हेक्टरवर लागवड शक्य आहे.

कापूस लागवडीत जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका आघाडीवर राहणार आहे. जामनेरात कापसाची लागवड सुमारे ८० हजार हेक्टरवर होईल. लागवड स्थिर राहणार आहे. कुठलीही वाढ त्यात शक्य नाही. जामनेर तालुका दरवर्षी कापूस लागवडीत आघाडीवर असतो. यंदाही या भागात लागवड अधिक होईल. यापाठोपाठ चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, जळगाव या भागांत कापसाची लागवड होईल.

कापूस लागवडीसंबंधी शेतकरी तयारी करीत आहेत. काही भागात पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची लागवड झाली आहे. तर काही शेतकरी यंदा लागवड उशिरा करतील, अशी स्थिती आहे. कारण सध्या तापमान अधिक किंवा ४५ अंश सेल्सिअसवर आहे. जिल्ह्यात सर्वांत कमी कापूस लागवड बोदवड भागात होईल.

या भागात जलसाठे कमी आहेत. तसेच क्षेत्रही कमी आहे. यामुळे या भागात लागवड दरवर्षी सर्वांत कमी असते. तापी पट्ट्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा भागांत कापूस लागवड स्थिर राहू शकते. चोपडा भागात एकूण कापूस लागवड ५५ हजार हेक्टरवर होईल. या भागातही लागवड फारशी वाढ होणार नाही. लागवडीत घट होईल, असा अंदाज आहे.

बियाणे टंचाईचा फटका

कापूस लागवडीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे. परंतु बाजारात बियाण्याची टंचाई आहे. अनेक शेतकऱ्यांना हवे ते बियाणे उपलब्ध होत नाही. जिल्ह्यातील जामनेरात कापूस बियाण्याची मागणी अधिक आहे, परंतु या भागात टंचाई अधिक आहे. अन्य भागातील शेतकरीदेखील जामनेरात कापूस बियाण्यासाठी जात आहेत.

यामुळे बियाणे विक्रेत्यांवर ताण येत असून, काही जण याचा गैरफायदा घेऊन काळाबाजार करीत आहेत, असाही तक्रारी आहेत. अन्य भागातही कापूस बियाण्यासाठी शेतकरी बाजारात येत आहेत. परंतु पुरेसे बियाणे नसल्याने शेतकऱ्यांना परत जावे लागत आहे. बियाणे उपलब्ध झाल्यानंतर अनेक शेतकरी लागवड करतील. ही लागवड १ ते ५ जून या कालावधीत होईल. तोपर्यंत काही शेतकरी आपापल्या शेतात मशागत उरकून ठिबक संच बसविणे व अन्य कार्यवाही करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Diversification: पीक पद्धतीत बदलाचा अभाव

Forest Rights Act: वनहक्क कायद्याच्या बळावर ग्रामसभा स्वावलंबी

Climate Smart Farming: हवामान बदलानुसार शेतीचे योग्य व्यवस्थापन करा

Raju Shetti: कर्जमाफीत आकड्यांचा जुगाड, राजू शेट्टींची जोरदार टीका, ७ मुद्दे केले उपस्थित

Water levels Drop: लघू प्रकल्पांत दोन टक्के,तर मध्यम प्रकल्पांत तीन टक्के घट

SCROLL FOR NEXT