Cotton Farming : कपाशी साडेचार हजार हेक्टरने वाढण्याचा अंदाज

Cotton Production : परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात कपाशीच्या लागवड क्षेत्रात ४ हजार ४७८ हेक्टरने वाढ गृहीत धरून १ लाख ९७ हजार हेक्टरवर लागवड, तर हेक्टरी ४ क्विंटल ३८ किलो उत्पादकता प्रस्तावित आहे.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात कपाशीच्या लागवड क्षेत्रात ४ हजार ४७८ हेक्टरने वाढ गृहीत धरून १ लाख ९७ हजार हेक्टरवर लागवड, तर हेक्टरी ४ क्विंटल ३८ किलो उत्पादकता प्रस्तावित आहे. यंदा लागवडीसाठी कपाशी बियाण्याच्या ११ लाख ८३ हजार ५०० पाकिटांची मागणी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली आहे.

Cotton Farming
Cotton Farming : कापसाची करुण कहाणी

जिल्ह्यातील जिरायत क्षेत्रातील शेतकऱ्यांचे खरिपातील कपाशी हे प्रमुख नगदी पीक आहे. परंतु अलीकडील काही वर्षांत कपाशीचा वाढलेला उत्पादन खर्च, कमी बाजारभाव, घटलेली उत्पादकता आदी कारणांमुळे कपाशीच्या तुलनेत किफायतशीर ठरत असलेल्या सोयाबीन या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. परिणामी, कपाशीच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्यात २०१८ ते २०२३ या पाच वर्षांतील कपाशीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९३ लाख ४२३ हेक्टर तर उत्पादकता हेक्टरी ३ क्विंटल ३४ किलो आहे.

गतवर्षी जिल्ह्यात कपाशीची १ लाख ९२ हजार ५२२ हेक्टरवर लागवड झाली. तर हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो उत्पादकतेनुसार एकूण ७६ हजार ८१३ टन उत्पादन मिळाले. मागील वर्षी अवर्षणाच्या स्थितीमुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत मोठी घट झाली. बाजारभाव देखील कमी आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील कपाशीच्या लागवड क्षेत्रात गतवर्षीहून ४ हजार ४७८ हेक्टरने वाढ होऊन १ लाख ९७ हजार हेक्टरवर लागवड तसेच हेक्टरी ४ क्विंटल ३८ किलो उत्पादकता प्रस्तावित केली आहे.

Cotton Farming
Cotton Production : भारत कापूस उत्पादनात पडतोय पिछाडीवर

शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी बी. टी. कपाशीच्या ११ लाख ८३ हजार ५०० बियाणे पाकिटांची मागणी विविध खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

कपाशी बियाणे पाकिटांची मागणी स्थिती

कंपनीचे नाव वाण बियाणे पाकिटे मागणी

अजित १५५ १३५००

अजित १९९ १४५००

अजित १११ १२०००

नुजीविडू मल्लिका ११२००

नुजीविडू भक्ती १०२००

नुजीविडू राजा ९७००

नुजीविडू बलवान १२०००

आदित्य वेदा ७५०००

राशी ६५९ ७२५००

राशी ७७९ ७००००

ग्रीन गोल्ड विठ्ठल ९०००

कावेरी जादू ६५०००

तुलसी ---- .४२५००

श्रीकर -- ३६०००

इतर -- ५५२४००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com