Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation : पावसाळ्याच्या तोंडावर ‘जलतारा’ची लगीनघाई

Jaltara Project : शेताच्या एका कोपऱ्याला उताराने वाहून येणारे पाणी साठून जमीन चिबड होते. या चिबड जमिनीत शेतकऱ्यांना पिके घेता येत नाहीत.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : शेताच्या एका कोपऱ्याला उताराने वाहून येणारे पाणी साठून जमीन चिबड होते. या चिबड जमिनीत शेतकऱ्यांना पिके घेता येत नाहीत. याच ठिकाणी फेरभरणाच्या नव्या संकल्पनेतील शोषखड्डा घेऊन पाणी मुरवणे व चिबड जमीन पिकाखाली आणण्याच्या दुहेरी हेतूने जलतारा प्रकल्प घेण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर दोन्ही जिल्ह्यात जलतारा प्रकल्पासाठी लगीनघाई सुरु असून प्रत्येक विभागाला त्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात धाराशिव जिल्ह्यात सुमारे साडेबारा लाख जलतारा प्रकल्प घेण्यात येणार असून लातूर जिल्ह्यात केवळ वीस हजार प्रकल्पाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यात पावसाचा थेंब अन् थेंब जमिनीत मुरवण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी अमृतधारा अभियान हाती घेतले असून या अभियानातच जलतारा प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. मळवटी (ता. लातूर) येथे शनिवारी (ता. २६) उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांच्या हस्ते जलतारा प्रकल्पाचा प्रारंभ झाला. तहसीलदार सौदागर तांदळे, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत, सरपंच गोविंद गरड, जिल्हा बँकेचे संचालक राजकुमार पाटील व कृषी सहायक विशाल झांबरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

जिल्ह्यात यंदा वीस हजार जलतारा प्रकल्प घेण्यात येणार असून यात कृषी विभागाकडून दहा हजार तर जिल्हा परिषदेकडून दहा हजार प्रकल्प घेण्यात येणार आहेत. उद्दिष्ट कमी असले तरी जेवढ्या संख्येने शेतकरी या प्रकल्पासाठी पुढे येतील, तेवढ्या संख्येने जलतारा प्रकल्पांना मंजुरी देण्याबाबत जिल्हाधिकारी ठाकूर यांनी निर्देश दिल्याची माहिती उपजिल्हाधिकारीो (रोहयो) अहिल्या गाठाळ यांनी दिली.

दरम्यान मळवटी येथील शेतकरी किशोर पाटील यांच्या शेतात लोकसहभागातून जलतारा प्रकल्पाचे तीन खड्डे घेऊन त्यामध्ये मोठे दगड भरण्यात आले. जलतारा प्रकल्पाचे महत्त्व व त्यामुळे होणारा बदल इत्यादी विषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जलतारा प्रकल्प आपल्या शेतातील ज्या भागात पाणी साचून राहते अशा जागी पाच फूट रुंद पाच फुट लांब व सहा फूट खोल अशा आकाराचा हा खड्डा घ्यावा.

त्यात ८० मिमी तसेच १०० मिमी आकाराचे दगड टाकून खड्डा भरावा. एक एकर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी या जलतारा खड्ड्यामध्ये जिरवणे शक्य आहे. एका जलतारा खड्ड्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यात साधारणतः साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीत मुरते त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. यामुळे सिंचन विहिरीची पाणी पातळी वाढून सिंचन विहिरीला पाझर जास्त काळ टिकण्यासाठी मदत होत असल्याची माहिती श्रीमती नऱ्हे-विरोळे यांनी दिली.

धाराशिव जिल्ह्यात जलताराची व्यापक मोहीम

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात ‘जलतारा’ मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महिनाभरात जिल्ह्यात एकूण १२ लाख ४४ हजार जलतारा अर्थात शोषखड्डे खोदण्यात येणार आहेत मोहिमेच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषद आणि कृषी विभागाकडे दिलेली आहे. त्यासाठीचे शोषखड्यांचे उद्दिष्ट विभागून देण्यात आले आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेकडे सहा लाख २२ हजार आणि कृषी विभागाकडे ६ लाख २२ हजार खड्डे खोदण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या चार दिवसांत २०० पेक्षा अधिक ''जलतारा'' खोदून पूर्ण झाले आहेत. ही मोहीम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. एक एकर क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी या जलतारामध्ये जिरवणे शक्य आहे. गाव व शिवारात मोठ्या संख्येने जलतारा शोषखड्डे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिले असून प्रत्येक विभागाला त्यांनी उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: ‘वैशाख वणव्या’पूर्वीच होरपळ

Unseasonal Rain Relief GR: अवकाळीग्रस्त ९ जिल्ह्यांतील ६६ हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ५३ कोटी ७३ लाख मदत मंजूर

Cotton, Soybean Rate: हळदीच्या भावात सुधारणा होण्याचे संकेत आहेत का ?

Village Development: गावच्या विकास निधीसाठी आता ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य

Silk Production: ‘महारेशीम अभियाना’ला नांदेड जिल्ह्यात प्रतिसाद: वडवळे

SCROLL FOR NEXT