Farmer Debt Relief Scheme: तपासणीची कामे शुक्रवारपासून (ता. ५) राज्यभर सुरू करून २० जूनपर्यंत समाप्त करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. तपासणीसाठी जिल्हास्तरावर लेखा परीक्षक तसेच सहकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस वेग आला आहे. कर्जखात्यांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये तपासणीसाठी वेळप्रसंगी शेजारील जिल्ह्यातील दुग्ध, पणन, साखर विभागातील कर्मचाऱ्यांचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. .पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत अल्पमुदत, पुनर्गठीत आणि फेरपुनर्गठीत कर्जांचा समावेश आहे. व्यक्तिगत शेतकऱ्यांना व्यक्तिगत आणि संयुक्त खात्यांमध्ये किसान क्रेडिट कार्डवर दिलेल्या कर्जांचा समावेश आहे. मात्र, सोने तारणावर दिलेली पीककर्जे, संयुक्त जबाबदारी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी बचत गट, शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्थांना तसेच करार शेतीमधील व्यवसायासाठी दिलेली कर्जे या योजनेत पात्र नसतील, असे सहकार खात्याने स्पष्ट केले आहे..Jalna Annual Credit Plan: जालना जिल्ह्यासाठी ८ हजार कोटींवर वार्षिक पत आराखडा.सहकार खात्याने क्षेत्रीय स्तरावरील विशेष लेखापरीक्षक वर्ग १ व वर्ग २, लेखा परीक्षक श्रेणी १ व २ तसेच उपलेखापरीक्षकांना राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची काळजीपूर्वक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत..Crop Loan Limit: पीककर्जाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या चार बँकांना नोटिसा.कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी बॅंकांकडील थकीत कर्जखात्याची माहिती संकलित होण्यासाठी योजनेची संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या संस्था तसेच बॅंकांकडून थकीत कर्जखाती तपासण्यासाठी कर्जखात्यांच्या याद्या ताब्यात घ्याव्यात, असे या लेखापरीक्षकांना सांगण्यात आलेले आहे..मध्यम व दीर्घ मुदत कर्जांना माफी नाही‘अल्पमुदत, पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांनाच ही योजना लागू असेल. मात्र मध्यम मुदत व दीर्घ मुदतीच्या शेती कर्जांना योजनेतून काहीही सवलत दिली जाणार नाही,’ असेही लेखा परीक्षकांना सांगण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.