Weather Update: यंदाच्या हंगामात कमी पावसाच्या अंदाजाने बळीराजाच्या काळजाचा ठोका चुकला असताना, नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) अखेर केरळात आगमनाची मोहोर उमटविली आहे. केरळमध्ये तीन दिवस उशिराने पोहोचलेल्या मॉन्सूनच्या जलोत्सवाला प्रारंभ झाला आहे. दोन ते तीन दिवसांत मॉन्सून संपूर्ण गोव्यासह महाराष्ट्रात दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. .अंदमानात सहा दिवस आधीच (१६ मे) दाखल झालेल्या मॉन्सूनने केरळातील आगमनाचा मुहूर्त मात्र चुकविला. यंदा २६ मे रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. मॉन्सूनचे आगमन ४ दिवसांनी मागे-पुढे होण्याची तफावत गृहीत धरण्यात आले होती. त्यानुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत मॉन्सून केरळमध्ये पोहोचण्याची अपेक्षा होती. दीर्घकालीन आगमनाची १ जून ही तारीख देखील टळल्यानंतर गुरुवारी (ता. ४) मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे हवामान विभागाने अधिकृतपणे जाहीर केले..Monsoon In Kerala: माॅन्सूनची जोरदार मुसंडी; केरळ व्यापत कर्नाटकपर्यंत मजल, २ दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज.गेल्या दोन दिवसांत आग्नेय अरबी समुद्रावर मेघगर्जनेस अनुकूल ढगांची गर्दी वाढली. आग्नेय अरबी समुद्रावर पश्चिमेकडून वाहणारे वारे सरासरी समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेले आहेत. खालच्या स्तरांवरील या पश्चिमी वाऱ्यांचा वेग सुमारे २० ते २५ नॉट्स इतका आहे. गेल्या दोन दिवसांत केरळमध्ये अनेक ठिकाणी व्यापक स्वरूपाचा पाऊस पडत असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. वरील सर्व अनुकूल परिस्थिती लक्षात घेता, नैॡत्य मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्याचे जाहीर करण्यात आले..Monsoon In Kerala 2026 : मॉन्सून २४ तासात केरळात दाखल होणार; राज्यात वादळी पावसाचा इशारा.मॉन्सनने गुरुवारी (ता. ४) नैॡत्य व आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिनचा उर्वरित भाग व्यापून, पश्चिम-मध्य व पूर्व-मध्य अरबी समुद्राच्या काही भागासह संपूर्ण लक्षद्वीप बेटसमूह, केरळच्या भागात आगेकूच केली. कर्नाटकाच्या दक्षिणकेडील काही भाग, तमिळनाडूचा केरळ लगतचा भाग आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. मंगळूरू, उदगमंडलम, कोडाईकॅनॉलपर्यंतच्या भागापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीची सीमा आहे..पुढील दोन ते तीन दिवसांत प्रगतीसाठी अनुकूल वातावरण आहे. मॉन्सून मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपूर्ण गोव्यात, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तमिळनाडूच्या उर्वरित भागासह, कर्नाटकचा आणखी काही भाग व आंध्र प्रदेशात देखील मॉन्सूनची आगेकुच होण्याचे संकेत आहेत. यातच बंगालच्या उपसागरातून पुढे चाल करत ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मॉन्सून धडक देण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे..नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा सरासरीपेक्षा कमी म्हणजेच अवघा ९० टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केला. मोसमी हंगामावर ‘एल निनो’चे सावट असल्याने यंदा महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात कमी पावसाचे भाकीत वर्तविण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.