Jackfruit Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Jackfruit Disease : फणस पिकातील ‘फळकुज’ समस्या गंभीर

Agricultural Challenges : फणस हे कोकणामधील महत्त्वाचे फळझाड आहे. या फळझाडामध्ये पानावरील ठिपके, डायबॅक, पिंक रोग, तांबेरा आणि फळकुज अशा अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये फळकुज हा महत्त्वाचा रोग आहे.

Team Agrowon

राहुल वडघुले

Fruit Rot Issue : फणस हे कोकणामधील महत्त्वाचे फळझाड आहे. या फळझाडामध्ये पानावरील ठिपके, डायबॅक, पिंक रोग, तांबेरा आणि फळकुज अशा अनेक बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. यामध्ये फळकुज हा महत्त्वाचा रोग आहे.

फळकुजमुळे संपूर्ण फळ खराब होते. अशा फळांना बाजारातही चांगली किंमत मिळत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान होते. आजच्या लेखात फणसामधील फळकुज या रोगाविषयी माहिती घेऊया.

लक्षणे :

या रोगाची लक्षणे प्रामुख्याने लहान फळावर येतो.

फळावर अगोदर तपकिरी पाणीदार ठिपके पडतात. अशी फळे मऊ पडतात. त्यांची वाढ खुंटते. या नंतर फळावर राखेडी रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसू येते. ही वाढ अतिशय कापशी असते. मांजराच्या फुललेल्या शेपटीसारखे फळ दिसू लागते.

प्रादुर्भावग्रस्त फळ झपाट्याने संपूर्ण काळे पडते. असे फळ नंतर वाळून कडक होऊन गळून जाते.

मोठ्या फळांवर देखील रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.

रोगाची ओळख :

रोगाचे नाव : फळकुज रोग

रोगाचे कारण : हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

शास्त्रीय नाव : Rhizopus stolonifer

बुरशीचे फायलम : Phycomycetes

परजीवी प्रकार : saprophytes Parasite

नुकसान : या रोगामुळे पिकाचे १० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके : ही बुरशी मुख्यतः पीक काढणीनंतर रोग निर्माण करते. टोमॅटो, स्ट्रॉबेरी, कलिंगड, पपई, द्राक्ष इत्यादी.

पोषक वातावरण :

या रोगासाठी दमट आणि पावसाळी वातावरण पोषक असते. तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस, जास्त आर्द्रता आणि ओलसर फळ असे वातावरण रोगासाठी अत्यंत पोषक असते. ओलसरपणा आणि कोंदट हवा हे अत्यंत महत्त्वाचे कारण या रोगाच्या वाढीसाठी आहे.

रोग कसा निर्माण होतो :

या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा बीजाणू जमिनीत, झाडांवर किंवा इतर सडणाऱ्या पदार्थांवर जिवंत राहतात. हे बीजाणू किंवा तंतू २ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. नंतर हवा, कीटक यांच्यामार्फत ते यजमान पिकांवर पोहोचतात.

पोषक वातावरण तयार होताच, मुख्य पिकावर रोगाची लागण होते. याला ‘प्राथमिक लागण’ म्हणतात. रोगाची लागण झाल्यानंतर १ ते २ दिवसांत रोगाची लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांमध्ये अनेक बीजाणू तयार होतात. हे बीजाणू हवेमार्फत इतर यजमान पिकांवर जाऊन पुढे रोगाचा प्रसार होतो. यालाच ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय :

लागवड क्षेत्रात झाडांची खूप गर्दी नसावी.

झाडावरील फांद्यांची गर्दी कमी करावी.

झाडामध्ये हवा खेळती राहावी.

झाडावरील व खाली पडलेली रोगग्रस्त फळे उचलून नष्ट करावीत.

बागेत सडलेले इतर पीक अवशेष असतील तर ते बागेतून बाहेर नेऊन नष्ट करावेत.

झाडांच्या आजूबाजूला पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

शिफारस केलेली बुरशीनाशकांचा वापर करावा.

सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते?

या रोगाचे बीजाणू, बीजाणूदंड आणि बीजाणू धानी सूक्ष्मदर्शिकेखाली स्पष्टपणे पाहू शकतो. नवीन बीजाणूदंड आणि बीजाणूधानी या रंगहीन किंवा पांढऱ्या दिसून येतात. पक्व झाल्यानंतर हे राखेडी ते काळ्या रंगाचे दिसतात. बीजाणू हे रंगहीन, गोलाकार असतात. यामध्ये पेशीभित्तिका नसते. बीजाणूंच्या पृष्ठभागावर उंच सखल वळ्या दिसून येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT