Aslam Abdul Shanedivan
मिरची पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो
मुख्यत: फ्युझारियम मर रोग, फायटोप्थोरा रोग, ॲन्थ्रॅक्नोज, जिवाणूजन्य करपा, भुरी रोग, विषाणूजन्य मोझॅक असे रोग दिसून येतात
तसेच मिरची पिकावर पानांवर ठिपका रोगही होतो. याच्याआधी तो राज्यात दिसला नव्हता. पण आता समोर आला आहे.
ठिपका रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानांवर तसेच फळे आणि फांदी यावर दिसून येतात
याची लक्षणे आधी जमिनीलगत असलेल्या पानांवर आणि नंतर झाडावरील नवीन पानांवर दिसू लागतात. फळांवर गर्द तपकिरी, तर फांद्यांवर काळे चट्टे दिसतात.
पानाच्या मध्यभागी पांढरे त्याच्या बाजूला तपकिरी आणि त्या बाजूला गर्द तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसतात.
या रोगामुळे सुरुवातीला खालील पाने गळतात व नंतर वरील भागातील पाने गळतात.