Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

Politics Update : आरक्षण जाईल हा काँग्रेसचा खोटा प्रचार

Amit Shah : देशात एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण कोणीही काढू शकत नाही. ही मोदीजींची गॅरंटी आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘देशात भाजप सत्तेत आली, तर संविधान बदलले जाईल, आरक्षण जाईल, असा खोटा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत संपूर्ण बहुमत असूनही आम्ही संविधान बदलले नाही. देशात एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण कोणीही काढू शकत नाही. ही मोदीजींची गॅरंटी आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ स्थानिक क्रिकेट मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार चैनसुख संचेती, मनसेचे उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

अमित शाह म्हणाले, की इंडिया अलायन्स राम मंदिर निर्माणाच्या विरोधात होते. राम मंदिराचा मुद्दा त्यांनी गुंडाळून ठेवला होता. मोदीजी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भूमिपूजन केले, न्यायालयातील केस जिंकली आणि प्राणप्रतिष्ठाही केली.

५०० वर्षांनंतर या रामनवमीला रामाच्या मूर्तीवर ‘सूर्यतिलक’ झालेला जगाने पाहिला. राम भक्तांची वर्षानुवर्षांची इच्छा पूर्ण झाली. मोदी विकासाची कावड घेऊन पूर्व-पश्‍चिम, उत्तर-दक्षिण निघालेले आहेत. काँग्रेसने देशाच्या अर्थव्यवस्थेला ११ व्या स्थानावर सोडले होते. पंतप्रधान मोदींनी पाचव्या क्रमांकावर आणले.

आता पंतप्रधान झाल्यानंतर आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर आणली जाईल. यामुळे शेतकरी, गोरगरीब, युवकांना याचा फायदा होईल. या वेळी अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT