Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती पुतीनसारखीच

Sharad Pawar on PM Modi : आज मोदी यांच्या माध्यमातून भारतातही नवीन पुतीन तयार होईल की काय? अशी चिंता या देशातील जनतेला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
Sharad Pawar
Sharad Pawar Agrowon
Published on
Updated on

Amravati News : मी म्हणजेच रशिया अशी व्यवस्था तेथील राष्ट्राध्यक्ष वाल्दिमिर पुतीन यांनी उभी केली आहे. हुकूमशाही व्यवस्थेचे प्रतीक रशिया झाले आहे. तेथील शासन व्यवस्था, प्रशासन हे सर्व काही पुतीन यांच्या नियंत्रणात आहे. आज मोदी यांच्या माध्यमातून भारतातही नवीन पुतीन तयार होईल की काय? अशी चिंता या देशातील जनतेला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २२) येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते मुकुल वासनिक, आमदार यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.

Sharad Pawar
Sharad Pawar : तुम्ही अजून पाहिलेय काय?...सारखे सारखे वय काढू नका

‘पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आपले उमेदीचे आयुष्य ब्रिटीश काळात ११ वर्षे तुरुंगात घालविले. त्यानंतर पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी देशाला विकासाच्या क्षेत्रात गतीमान केले. आज त्याच विकसित देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) असून जागतिकस्तरावर गवगवा करण्याचे अनेक मुद्दे यापूर्वीच्याच पंतप्रधानांनी त्यांना उपलब्ध करून दिले आहेत, हेही ते विसरतात.

नवा भारत कसा उभा करता येईल, असा संदेश आजवर आपल्या सभांतून सर्वच पंतप्रधानांनी दिला, परंतु मोदी याला अपवाद ठरले आहेत. स्वतःचे काहीच कर्तृत्व नसेल अशा व्यक्‍ती केवळ दुसऱ्यांचे दोष शोधण्यातच वेळ घालवतात आणि विकासाचे मुद्दे नसतील तेव्हा धर्माबद्दल बोलतात. त्यावरूनच त्यांचे स्वतःचे कर्तृत्व शून्य असल्याचे सिद्ध होते’,

Sharad Pawar
Sharad Pawar : 'बोट धरून शिकलो म्हणणारेच आज भूमिका बदलत आहेत'; शरद पवार यांची मोदींवर टीका

असेही श्री. पवार म्हणाले. देशातील संसदीय लोकशाही धोक्‍यात असल्याचे अनेक जण बोलतात ते काही खोटे नाही. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेसह लष्कर, हुकूमशाही होती हे आपण अनुभवले. तशी परिस्थिती भारतात निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यायची असेल तर मोदींना रोखावे लागेल, असेही श्री. पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी या वेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. ‘गेल्या ७५ वर्षांत काँग्रेस (Congress) सरकारने देशाला जेवढे लुटले नाही, तेवढे मोदी सरकारने देशाला लुटले. विदर्भात एकही उद्योग केंद्र सरकारने का आणला नाही?’ असा प्रश्‍नही त्यांनी केला.

अमरावतीकरांची माफी मागतो

पाच वर्षांपूर्वी आम्ही अमरावतीतून एका उमेदवाराला लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला होता. त्या वेळी मीच त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. माझ्या शब्दाला मान देत अमरावतीकरांनी त्या उमेदवाराला मतदान करून विजयी केले.

परंतु नंतर संबंधित खासदाराची भूमिका पाहता मी फार मोठी चूक केली याचे मला शल्य आहे. त्यामुळेच मला अमरावतीत केवळ माफी मागायला यायचे होते. ती संधी आज मला मिळाली, त्यामुळे सर्वांत आधी मी माफी मागतो, असे म्हणत शरद पवार यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com