Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Lagwad : सघन पद्धतीने कपाशी लागवड

Cotton Update : या हंगामात सघन पद्धतीने कपाशीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यातील मालवाडा शिवारात दिलीप ठाकरे यांच्या शेतात जिल्हास्तरीय कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत लागवडीस प्रारंभ झाला.

Team Agrowon

Akola Cotton Cultivation : या हंगामात सघन पद्धतीने कपाशीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शुक्रवारी (ता. २३) जिल्ह्यातील मालवाडा शिवारात दिलीप ठाकरे यांच्या शेतात जिल्हास्तरीय कृषी अधिकारी, शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत लागवडीस प्रारंभ झाला.

श्री. ठाकरे हे मागील काही वर्षांपासून सघन पद्धतीने कापूस लागवड करीत आहेत. आता त्यांच्यासह इतर शेतकरीसुद्धा यासाठी पुढे आले आहेत. जिल्ह्यात यंदा अशा पद्धतीने सुमारे १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवडीचे नियोजन झाले आहे. अद्याप पुरेसा पाऊस झालेला नसला तरी हवामान खात्याचे अंदाज लक्षात घेता शेतकरी लागवडीसाठी पुढे येऊ लागले आहेत.

सिंचनाची सोय असल्याने श्री. ठाकरे यांनी शुक्रवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. प्रकाश घाटोळ, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी एस .टी .चांदूरकर, कृषी उपसंचालक संध्या करवा, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मुरूमकर, बाळापूर तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने, मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, बियाणे कंपनी प्रतिनिधी उमेश भगत, अंकुश जाधव, गौरव मानकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

यंत्राचा साह्याने ही लागवड सुरू झाली आहे. विधिवत पूजनानंतर पहिल्याच दिवशी आठ ते नऊ एकरांत सघन पद्धतीने कपाशी बियाण्याची पेरणी करण्यात आली. एकरी सहा बॅग बियाणे या पद्धतीत वापरले जाते. एकरी झाडांची संख्या ही २५ हजारांवर ठेवली जाते. त्यामुळे शाश्वत उत्पादन मिळतो, असा या शेतकऱ्यांचा अनुभव तयार झालेला आहे.

या पद्धतीने लागवडीबाबत श्री. ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना तांत्रिक माहिती, आजवरची उत्पादकता, पिकाचे व्यवस्थापन तसेच खत, कीडनाशक व्यवस्थापनाची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Diwali Festival : सांस्कृतिक सपाटीकरणात सापडलेली दिवाळी

Safflower Cultivation : करडईची सुधारित पद्धतीने लागवड

Spice Industry : चटणी, मसाला उद्योगातून समृद्धी

Agriculture Development : कृषी क्षेत्रामध्ये झांबियाची वाढतेय गुंतवणूक

Weekly Weather : ईशान्य मॉन्सून महाराष्ट्राबाहेर मार्गस्थ

SCROLL FOR NEXT