Cotton Cultivation : सघन कापूस लागवड ओलांडणार यंदा दहा हजार एकरांचा टप्पा

Akola Kapus Lagwad : अकोला जिल्ह्यात या वर्षात १० हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होईल, अशी अपेक्षा प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

Akola Cotton Production News : कापूस उत्पादनाच्या (Cotton Production) क्षेत्रात आणि त्यातही कोरडवाहू भागात सघन पद्धतीने कापूस लागवड (Cotton Cultivation) करीत शाश्‍वत उत्पादकता मिळवण्यासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरू लागले आहे.

शेतकऱ्यांमध्ये याचा प्रसार वेगाने होत असून अकोला जिल्ह्यात या वर्षात १० हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होईल, अशी अपेक्षा प्रयोगशील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.

सध्या पाऊस नसल्याने कापूस लागवड लांबत चालली आहे. अशा वेळी सघन लागवड पद्धतीचे पुरस्कर्ते असलेले ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या हंगामात अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात प्रामुख्याने उत्तरेकडील गावांमध्ये तसेच खारपाण पट्ट्यात किमान १० हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर या पद्धतीने कापूस लागवडीची तयारी आहे.

या लागवडीसाठी बैठका, कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत थेट शेतकरी संपर्क तसेच शेतकरी ते शेतकरी अशा पद्धतीची तयारी होत आहे.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : कापूस पिकातील सघन लागवड फायद्याची

असे आहे सघन कापूस उत्पादन तंत्र
या पद्धतीमध्ये एकरी सहा पाकिटे बियाणे वापरले जाते. दोन झाडांतील अंतर १५ सेंटीमीटर, तर दोन ओळीचे अंतर ९० सेंटीमीटर ठेवले जाते. अशा लागवडीमुळे एकरी २९ हजार ४० झाडे लागतात. उगवण क्षमता कमी झाली तरीही किमान २५ हजार झाडे राहतात.

एका झाडाला कमीत कमी १५ ते १६ बोंडे आणि एका बोंडाचे वजन सरासरी ४ ते ६ ग्रॅम एवढे गृहीत धरले जाते. त्यामुळे किमान एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन येते. जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तरी डिसेंबरपर्यंत शेत रिकामे होऊन रब्बीत दुसरे पीक घेता येते. लवकर येणाऱ्या वाणांचा या लागवडीसाठी वापर केला जातो.

झाडांची संख्या जास्त राहत असल्याने खाडे भरण्याची गरज पडत नाही. पीक एक समान पद्धतीने वाढते. पिकाला किमान तीन वेळा खतमात्रा व चार फवारण्या घेतल्या जातात. फवारण्यांमध्ये दोनवेळा झाड वाढरोधक वापरले जाते.

कमी खर्चात शाश्‍वत उत्पादकता मिळवून देण्यात ही लागवड यशस्वी होत असल्याने कापूस उत्पादकांचा कल याकडे वाढत आहे.

मी सन २०१६ पासून यामध्ये काम करीत आहे. सन २०१८ मध्ये कमी पाऊस होऊनही माझ्या शेतात कपाशीची उत्पादकता १६ क्विंटलपर्यंत होती. तर दुसरीकडे मागील हंगामात जास्त पाऊस झाल्याने हीच उत्पादकता ११ क्विंटल मिळाली.

यंदा जिल्ह्यात १० हजार एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर सघन पद्धतीने कापूस लागवडीची शक्यता आहे. काहींची लागवड सुरु झाली आहे. तर काही शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत थांबलेले आहेत. यंदा आमचे ५० एकर लागवडीचे नियोजन आहे.
- दिलीप ठाकरे, कापूस उत्पादक, मालवाडा, ता. बाळापूर, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com