Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Cotton Cultivation : कपाशीचे लागवड क्षेत्र अधिक असले तरी उत्पादकतेच्या बाबतीत भारताची पिछाडी आहे. त्यापार्श्‍वभूमीवर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.

Team Agrowon

Nagpur News : कपाशीचे लागवड क्षेत्र अधिक असले तरी उत्पादकतेच्या बाबतीत भारताची पिछाडी आहे. त्यापार्श्‍वभूमीवर वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून सघन कापूस लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. ही पध्दत उत्पादकता वाढीसाठी पोषक ठरेल, असा विश्‍वास केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी व्यक्‍त केला.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या भेटीप्रसंगी त्यांनी सघन कापूस लागवड प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या संयुक्‍त सचिव प्राजक्‍ता वर्मा, भारतीय कापूस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद, प्रक्रिया आणि अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. के. नरसैय्या, महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग आयुक्‍त ए.एल. वाघामारे, ए. पांडा, सीरकॉट संचालक डॉ. एस.के. शुक्‍ला, कापूस विपणन विषयाचे अभ्यासक गोविंद वैराळे, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, सहाय्यक आयुक्‍त सुदीप सिंग बदवरिया, सहाय्यक महासंचालक डॉ. पी.के. डॅश यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी पुरुषोत्तम काळे व दिलीप ठाकरे यांचा समावेश होता.

पुढे बोलताना गिरिराज सिंग म्हणाले, की अकोला जिल्ह्यात सद्यःस्थितीत सुमारे तीन हजार हेक्‍टरवर सघन पद्धतीने कापूस लागवड होत आहे. येत्या हंगामात हे क्षेत्र ५० हजार हेक्‍टरवर नेण्याचे प्रस्तावीत आहे.

सघन पद्धतीला प्रोत्साहन मिळावे याकरिता कापूस लागवड ते वेचणी अशा टप्प्यावर यंत्राचा उपयोग करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासोबतच उत्पादित कापसावर त्याच भागात प्रक्रिया व्हावी याकरिता उद्योगांची उभारणी देखील होईल.

देशभरात हे अकोला मॉडेल प्रचलीत केले जाणार आहे. अकोला मॉडेलचा प्रसार विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील केला जाईल. त्याव्दारे कापसाच्या उत्पादकता वाढीचा उद्देश साधणे शक्‍य होणार असल्याचे डॉ. गिरिराज सिंग यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT