Yellow Mosaic Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Disease : विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोग, पांढऱ्या माशीचे एकात्मिक नियंत्रण

Soybean Farming : सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पांढऱ्या माशीमार्फत होतो.

Team Agrowon

डॉ. प्रमोद मगर, डॉ. सुरेश नेमाडे

Soybean Yellow Mosaic : सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पांढऱ्या माशीमार्फत होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते.

रोगाचे संक्रमण फुलोरा अवस्थेतील पिकात झाल्यास, ९० टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ७५ दिवसांपर्यंत झाल्यास अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.

अनुकूल घटक

या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी मार्फत होतो.

दाट पेरणी, नत्रयुक्त खताचा अतिवापर आणि रोग वाहक पांढरी माशी या घटकांमुळे या रोगाचे प्रमाण वाढते.

रोगाची लक्षणे

पानांचा काही भाग हिरवट, तर काही भाग पिवळसर दिसून येतो. पानांमधील हरितद्रव्य कमी झाल्यामुळे अन्ननिर्मिती प्रकियेमध्ये बाधा निर्माण होते आणि उत्पादनात घट येते.

शेंड्यावरील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात.

शेंगामध्ये दाणे कमी भरतात.

अर्धी हिरवी पिवळी पाने असलेले प्रादुर्भावग्रस्त झाड लांबून देखील ओळखता येते.

एकात्मिक व्यवस्थापन

कीड-रोगांना प्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणाऱ्या सोयाबीन वाणांची लागवड करावी.

कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त झाडे वेळोवेळी काढून नष्ट करावीत.

लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात पीक तणमुक्त ठेवावे. बांधावरील यजमान वनस्पती नष्ट कराव्यात.

रोगवाहक किडीच्या सर्वेक्षणासाठी

शेतात हेक्टरी २५ पिवळे चिकट सापळे लावावेत.

गरजेनुसार शिफारशीत रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा.

रासायनिक नियंत्रण (फवारणी ः प्रति १० लिटर पाणी)

निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा निमआधारीत कीटकनाशकाची फवारणी करावी.

ॲसिटामिप्रीड (२५ टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (२५ टक्के डब्ल्यूजी) (संयुक्त कीटकनाशक) ५ ग्रॅम. (लेबलक्लेम शिफारस आहे.)

फवारणीसाठी वापरणाऱ्या पाण्याचा सामू ६ ते ७ दरम्यान असावा.

पांढऱ्या माशीची ओळख

ही अत्यंत महत्त्वाची रस शोषण करणारी कीड.

प्रौढ माशी ही १ ते २ मिमी आकाराची, फिक्कट हिरव्या रंगाची असते. तिच्या पंखावर मेणासारखा पातळ थर असतो.

किडीची पिल्ले व प्रौढ पानाच्या मागील बाजूस राहून पानातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. पाने पिवळी पडून व नंतर गळतात.

प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास फुले आणि शेंगा गळतात.

रस शोषण करताना ही कीड शरीरातून साखरेसारखा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकते. त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊन वनस्पतीच्या अन्न निर्मिती प्रक्रियेत बाधा पोचते.

पांढरी माशी ही सोयाबीन पिकातील मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पाने पिवळी पडतात. तसेच एकूण पीक उत्पादनात मोठी घट येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT