Fruit Crop Insurance Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

Insurance Update : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : हवामानावर आधारित असलेल्या फळपीक विमा योजनेअंतर्गत ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जिल्ह्यासाठी जाहीर झाला आहे. ३२ हजार ४४९ शेतकरी फळपीक विम्याच्या परताव्यासाठी पात्र ठरले आहेत. परतावा जाहीर झाला असला, तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम कधी जमा होणार, या बाबत प्रतीक्षा आहे.

आंबा, काजू पिकाचा परतावा जाहीर करण्यास उशीर झाला आहे. सहभागी ३० हजार ४ आंबा बागायतदारांपैकी २६ हजार ९६९ शेतकरी पात्र ठरले असून, ७० कोटी चार लाख २३ हजार ७०८ रुपये परतावा रक्कम जाहीर झाली आहे.

टक्केवारी ६९.०६ टक्के आहे. काजूसाठी प्रथमच चांगला परतावा जाहीर झाला आहे. सहभागी ६,८१४ शेतकऱ्यांपैकी ५,४८० शेतकरी पात्र ठरले. आठ कोटी ८० लाख ९५ हजार ८८२ रुपये परतावा रक्कम असून टक्केवारी १२६ टक्के आहे.

गतवर्षीच्या तुलनेत पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढली असली तरी परताव्याची रक्कम घटली आहे. ७,८३६ लाभार्थी वाढले; परंतु तुलनेने दोन कोटी ३९ लाख ८४४४ रुपये परतावा रक्कम कमी झाली आहे. तर काही मंडलांतील ट्रिगर अॅक्टिव्हेट होत नसल्यामुळे नुकसान होते. यावर उपाययोजना व्हावी, अशी मागणी राजन कदम यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT