Farmer Help : अर्थसहाय्य योजनेस सांगलीतील एक लाख ३९ हजार शेतकरी पात्र

Financial Assistance Scheme : सांगली जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक केलेल्या १ लाख ३९ हजार ६८८ शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेतून कापूस आणि सोयाबीन पिकास एक हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.
Financial Assistance Scheme
Financial Assistance Scheme Agrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यात २०२३ च्या खरीप हंगामात ई-पीक केलेल्या १ लाख ३९ हजार ६८८ शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेतून कापूस आणि सोयाबीन पिकास एक हेक्टरपर्यंत पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावात लावल्या आहेत. शेतकऱ्यांनी केवळ आधार कार्डची झेरॉक्स देऊन गावातील कृषी सहायकांकडे फॉर्मवर आपले नाव व स्वाक्षरी करून द्यावेत अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात २०२३ या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली होती. परंतु मागील वर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. खरीप हंगामात २०२३ मध्ये कापूस व सोयाबीन पीक लागवड करून त्याची ई-पीक पाहणी ऑनलाइन केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अर्थसहाय्य योजनेतून पाच हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

Financial Assistance Scheme
Special Financial Assistance Scheme : विशेष अर्थसाह्य योजनेचे दोन हजार प्रस्ताव मंजूर

जिल्ह्यात वैयक्तिक खातेदार ३० हजार, तर सामाईक खातेदार असलेले शेतकरी १ लाख ९०५३ असे एकूण १ लाख ३९ हजार ०५३ सोयाबीचे शेतकरी आहेत. तर वैयक्तिक खातेदार १४५ तर सामाईक खातेदार असलेले शेतकरी ४९० असे एकूण ६३५ कापूस पिकाचे शेतकरी आहेत. एक हेक्टर कापूस पिकाला पाच, तर एक हेक्टर सोयाबीन पिकाला पाच हजार असे अनुदान निश्वित करण्यात आले आहे. अर्थसहाय्य योजनेत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी प्रत्येक गावात कृषी सहायकांनी योजनेची यादी गावात लावली आहे. तसेच यादीत नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांचा कुठलाही खर्च होणार नाही, याची दक्षता शासनाने या योजनेत घेतली आहे. गावात लावलेल्या यादीत नाव असल्यास केवळ आधार कार्डची झेरॉक्स व प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांनी भरून कृषी सहायकांकडे द्यावे लागणार आहे. त्यामुळे यात शेतकऱ्यांचा कुठलाही खर्च होणार नाही. गावात लावलेल्या यादीत आपले नाव असल्यास शेतकऱ्यांनी केवळ आधार कार्डची झेरॉक्स व उपलब्ध करून दिलेल्या फॉर्मवर लाभार्थी शेतकऱ्याचे नाव, कापूस व सोयाबीन पिकाचे क्षेत्र व स्वाक्षरी करून द्यावी लागणार आहे.

Financial Assistance Scheme
Farmer Financial Assistance : पश्चिम विदर्भातील वीस लाख शेतकऱ्यांना अर्थसहाय्य

वैयक्तिक खातेदारांसाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड (स्वाक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत), संमतीपत्र, मोबाईल क्रमांक आवश्यक

सामूहिक खातेदारांसाठी कागदपत्रे

आधारकार्ड (स्वाक्षंकित केलेले झेरॉक्स प्रत), सामूहिक खातेदार ना-हरकत प्रमाणपत्र, संमतीपत्र, मोबाईल क्रमांक आवश्यक

जिल्ह्यांतर्गत सन २०२३ च्या खरिपातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत म्हणून कृषी विभागाद्वारे ०.२ हेक्टरहून कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार व त्याहून अधिक क्षेत्रासाठी (दोन हेक्टरच्या मर्यादेत) पाच हजार रुपये मदत लवकरच पात्र कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी त्वरित संबंधित अधिकारी, कार्यालयाशी संपर्क साधून जमा करावे.
विवेक कुंभार, जिल्हा कृषी अधीक्षक, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com