Fruit Crop Issue : अन्नद्रव्य व्यवस्थापनातून फळगळ थांबवा

Nutrient Management : सततच्या पावसामुळे संत्रा बागांमध्ये फळगळतीची समस्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कीड, रोगाचे नियंत्रण तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबींवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे तज्ज्ञ डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी केले.
Fruit Crop Issue
Fruit Crop IssueAgrowon
Published on
Updated on

Amravati News : सततच्या पावसामुळे संत्रा बागांमध्ये फळगळतीची समस्या निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कीड, रोगाचे नियंत्रण तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन या बाबींवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषी संशोधन केंद्र अचलपूरचे तज्ज्ञ डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी केले.

चांदूरबाजार सिट्रस इस्टेट तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्‍त सहकार्याने फळगळती असलेल्या बागांचे सर्व्हेक्षण व उपाययोजना हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी बागायतदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Fruit Crop Issue
Fruit Crop Issue : मृग बहरातील फळपिकांसाठीचे हवामान धोके

सद्यःस्थितीत पावसाची संततधार, ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव अशी अनेक कारणे कीड, रोगास पोषक आहेत. त्याच कारणामुळे बागांमध्ये बुरशीजन्य रोगही वाढीस लागतात. त्याच्या परिणामी फळांची गळती होत असल्याने शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून उपाययोजनांवर भर देत शिफारशीत बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले.

Fruit Crop Issue
Kharif Crop Issue : सततच्या पावसामुळे खरीप पिकांना धोका

आमदार बच्चू कडू यांनी सिट्रस इस्टेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्‍यक त्या वेळी मार्गदर्शन मिळावे. त्याकरिता तज्ज्ञांची सेवा उपलब्धतेवर भर द्यावा, असे सांगितले. या वेळी डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ. प्रशांत मगरे, अजय गाठे, पानवेली संशोधन केंद्राच्या तज्ज्ञ एस. एम. नागे, सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी एस. पी. दांडेगावकर, मनोज वानखेडे, मंडळ कृषी अधिकारी किशोर वनवे, सिट्रस इस्टेटचे कार्यकारिणी सदस्य संतोष किटुकले, पुष्पक खापरे, संदीप मोहोड, दिपाली डमके, नीलेश काजळकर, नीलेश ढोबळे, ललित कोठाले, वैभव इंगोले, दिनेश वराडे उपस्थित होते.

ब्राह्मणवाडा पाठक, वणी बेलखेडा, कुरणखेडा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, जसापूर, काजळी, माधान, हैदतपूर, वडाळा, फुबगाव, कुरळपूर्णा, थुगाव, पिंपरीपूर्णा, शिरजगाव कसबा, खरपी या गावातील बागांची पाहणी तज्ज्ञांनी करून बागायतदारांना मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com