Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : विभागीय आयुक्तांकडून अतिवृष्टिग्रस्त भागाची पाहणी

Heavy Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पार्डी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Team Agrowon

Nanded News : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पार्डी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. केळी उत्पादक शेतकऱ्यांना बागायती पिकाप्रमाणे शासकीय अनुदान देण्याची मागणी केली. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपाच्या पिकांना मोठा फटाका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नांदेडमधील साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

नदीकाठचे पिके वाहून गेली तर शेती खरडून गेली आहे. काही गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला होता. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बुधवारी (ता. ४) अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पार्डी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

केळी उत्पादकांना बागायती प्रमाणे मदत मिळणार

अर्धापूर तालुक्यांत केळीचे लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. अतिवृष्टीमुळे केळीच्या बागांना खूप मोठा फटाका बसला तरी शासनाचे अनुदान मिळत नाही. यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीत केवळ २७ हेक्टर क्षेत्र बागायती पिकांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.

ही बाब विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या निदर्शनास आणून दिली असता ज्या शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणीमध्ये केळीच्या लागवडीची नोंद केली आहे व ज्यांचे नुकसान झाले आहे आशा शेतकऱ्यांचा अहवाल पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदारांना दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT