Crop Damage : अतिवृष्टीमुळे ७ लाख ३५ हजारांवर शेतकरी बाधित

Heavy Rain : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत शनिवार (ता. ३१) ते सोमवार (ता. २) या कालावधीत अतिवृष्टी झाली.
Crop Damage Flood
Crop Damage FloodAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत शनिवार (ता. ३१) ते सोमवार (ता. २) या कालावधीत अतिवृष्टी झाली. यामुळे या दोन जिल्ह्यांतील १ हजार ४६६ गावांतील ७ लाख ३५ हजार १३० शेतकऱ्यांच्या ५ लाख ९२ हजार ३३० हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज आहे. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अंतिम बाधित निश्‍चित होईल, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे परभणीतील ७८२ गावांतील ४ लाख ४९ हजार १२ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण ३ लाख ३३ हजार ४३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्व ९ तालुक्यांतील ३ लाख ३३ हजार २१८ हेक्टरवरील जिरायती पिके तसेच जिंतूर व सेलू तालुक्यांतील २१४ हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.

Crop Damage Flood
Crop Damage : बीडमध्ये उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, कांद्याचे अतिवृष्टीने नुकसान

जिंतूर तालुक्यात १ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर पालम तालुक्यात १ व्यक्ती जखमी झाली. सर्व ९ तालुक्यांतील मिळून १०० गावांतील लहान मोठी मिळून २९८ जनावरे दगावली आहेत. सेलू तालुक्यातील ७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. २०७ घरांची पडझड झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील ६८४ गावांतील २ लाख ७६ हजार ११८ शेतकऱ्यांचे २ लाख ५८ हजार ८९८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Crop Damage Flood
Crop Damage Survey : अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा

त्यात सर्व ५ तालुक्यांतील २ लाख ४५ हजार ४८७ हेक्टरवरील जिरायती पिके तसेच हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यातील १३ हजार ३५१ हेक्टरवरील बागायती पिके, कळमनुरी, सेनगाव तालुक्यातील ६० हेक्टरवरील फळपिकांचा समावेश आहे.

दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. १०१ जनावरे दगावली आहेत. ६३२ घरांची पडझड झाली आहे. ही प्राथमिक अहवालानुसार प्राप्त झालेली माहिती असून, यात पंचनाम्यानंतर अंशतः बदल होऊ शकतो, असे महसूल तसेच कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी-हिंगोली अतिवृष्टी प्राथमिक

नुकसान स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र

परभणी १३० ८८५०० ७०२४४

जिंतूर १७० ९६३५२ ७४६०९

सेलू ९५ ३५४०५ ३७२१०

मानवत ५३ ३७७२५ २६११५

पाथरी २२ २८२२६ २६१०२

सोनपेठ ५२ २५४४२ १६०८१

गंगाखेड ८७ ५२६७० २७३३६

पालम ८० ४५४७० २९९४०

पूर्णा .८३ ४९२२२ २५७९५

हिंगोली १५१ ५९३६२ ५८४७०

कळमनुरी १२८ ५४८७० ६२०८७

वसमत १५२ ५७९२० ३६९३३

औंढानागनाथ १२२ ४६७०० ४१७७०

सेनगाव १३१ ५७२६६ ५९६३८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com