Cashew Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Crop : आजऱ्यात काजू बागांची कृषी शास्त्रज्ञांकडून पाहणी

Cashew Disease : आजरा तालुक्यात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काजू बागांचे नुकसान झाले आहे. महिनाभर झालेला पाऊस व कुंद वातावरणामुळे काजू बागांमध्ये बुरशीजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला.

Team Agrowon

Kolhapur News : तालुक्यातील काजू बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही झाडांची मर झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषी महाविद्यालय, कोल्हापूरच्या कृषी शास्त्रज्ञांनी बुधवारी (ता. ४) येथे भेट दिली. काही काजू बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाययोजनेबाबत माहिती दिली.

आजरा तालुक्यात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काजू बागांचे नुकसान झाले आहे. महिनाभर झालेला पाऊस व कुंद वातावरणामुळे काजू बागांमध्ये बुरशीजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे काही झाडांची मर झाली आहे.

कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अभयकुमार बागडे, रोगशास्त्र विभाग सहायक प्राध्यापक डॉ. रवींद्र कारंडे यांनी काजू बागांना भेट देऊन माहिती घेतली. ते म्हणाले, ‘सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काजू बागांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

हा फांदी मर, पिंक मर (पांढरे चट्टे) बुरशीजन्य रोग आहे. या काळात हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता होती. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वेगाने झाला आहे. बागेतील रोपांची मर झाली असून फांद्या वाळल्या आहेत. यामुळे सुमारे दहा ते पंधरा टक्के काजू उत्पादनात घट होणार आहे.

यापूर्वी २०१६-१७ मध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता. बुरशी नियंत्रकांची फवारणी आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व झाडांना बुरशीनियंत्रक फवारणी व जमिनीत आळवणी केली, तेथे अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही. या वेळी मंडल कृषी अधिकारी प्रदीप माळी, विजयसिंह दळवी, कृषी सहायक वैभव जौंदाळ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

Sericulture Farming: ‘ए ग्रेड’ रेशीम कोष उत्पादन हेच जाधव यांचे वैशिष्ट्य

CSR Funding Issue: सीएसआर निधी खर्चातील विसंगती

Festival Noise Pollution: गोंगाटात हरवलेला उत्सव

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT