Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bill Enquiry : कापूस मूल्य साखळीतील थकित बिलाची चौकशी

Outstanding Bill Update : राज्य शासनाने राबविलेल्या एकात्मिक कापूस मूल्य साखळी योजनेतील बिलाचा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे साडेतीन कोटी रुपयांच्या थकित बिलाबाबत कृषी आयुक्तालयाने अहवाल मागविला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य शासनाने राबविलेल्या एकात्मिक कापूस मूल्य साखळी योजनेतील बिलाचा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे साडेतीन कोटी रुपयांच्या थकित बिलाबाबत कृषी आयुक्तालयाने अहवाल मागविला आहे.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने परस्पर पुरवठादार व काही अधिकाऱ्यांना हाताशी धरीत योजना लादली. या योजनेतून अनावश्यकपणे कापूस वेचणी गोण्यांची खरेदी करण्यास भाग पाडले गेले. काही तालुक्यांना गोण्यांचा पुरवठा हंगाम संपल्यानंतर केला.

त्यामुळे शेतकऱ्यांना गोण्यांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे बिल अदा करण्याची गरजच नाही, असे मत काही कृषी अधिकाऱ्यांचे आहे. या योजनेत पुरवठादार म्हणून खासगी कंत्राटदाराऐवजी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाने काम केले आहे. काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात काही तालुका कृषी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद झाले आहेत.

त्याचा हकनाक फटका यंत्रमाग महामंडळाला बसला आहे. केवळ दोन तालुक्यांमधील अधिकाऱ्यांनी या योजनेचे बिल अदा करण्यात शंका उपस्थित केल्या आहेत. इतर जिल्ह्यातील पुरवठ्याबाबत वाद नाही. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने वेळेत गुंता सोडवायला हवा.

दुसऱ्या बाजूला यंत्रमाग महामंडळाने कृषी खात्याला पत्र दिले आहे. या योजनेतील थकित ३.४४ कोटी रुपयांचे बिल अदा करण्याची मागणी केली आहे. ‘‘२०२३-२४ मधील राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेअंतर्गत कापूस वेचणी बॅगची आवश्यकता होती.

बॅगचा पुरवठा कृषी विभागास महामंडळाने केला होता. जालना, नाशिक, बुलडाणा, बीड, नंदुरबार, अकोला आणि जळगावच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी बॅगची मागणी केली होती. त्यानुसार, महामंडळाने ६९ हजार २५० गोण्यांचा पुरवठा केला गेला. परंतु बिल चुकते केले नाही. महामंडळाने या कामात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. बिलासाठी आमच्या पुरवठादार संस्था पाठपुरावा करीत आहेत,’’ असे यंत्रमाग महामंडळाच्या मुख्य लेखाधिकाऱ्याने कृषी खात्याला कळविले आहे.

या जिल्ह्यांमधील पुरवठ्यावरून वाद

विभाग पुरवठा

गोण्यांत थकित रक्कम (रुपयांत)

जळगाव २४४०० १,२१,५१,२००

अकोला १६०० ७,९६,८००

नंदुरबार ५६०० २७,८८,८००

बीड ३२०० १५,९३,६००

शिरूर १६०० ७,९६,८००

पाटोदा ४०० १,९९,२००

गेवराई २००० ९,९६,०००

धारूर १६०० ७,९६,८००

परळी १४०० ६,९७,२००

अंबाजोगाई ६०० २,९८,८००

आष्टी १६०० ७,९६,८००

माजलगाव २००० ९,९६,०००

वडवणी १६०० ७,९६,८००

केज १६०० ७,९६,८००

बुलडाणा ११२०० ५५,७७,६००

नाशिक ३८०० १८,९२,४००

जालना ५०५० २५,१४,९००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

HTBT Cotton: ‘एचटीबीटी’ कापसावरील बंदी उठविली जाणार?

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत बदल अशक्य : कोकाटे

Nagpur Market Scam: नागपूर बाजार समितीतील घोटाळ्याची ‘लाचलुचपत’मार्फत चौकशी

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेला राज्यात थंडा प्रतिसाद

Vidarbha Rain Forecast: विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT