Parbhani News: परभणी व हिंगोली जिल्ह्यांत डिसेंबर २०२५ मध्ये १० अंश सेल्सिसपेक्षा कमी तापमान राहिले. सततच्या कमी तापमानाचा तडाखा रब्बी हंगामातील प्रमुख अन्नधान्य आणि चारा पीक असलेल्या ज्वारीला वाढीच्या अवस्थेत बसला आहे. तीव्र थंडीमुळे पीक अकाली पिवळे पडले असून वाढ खुंटली आहे. प्रतिकूल हवामानामुळे ज्वारीच्या धान्य व कडबा उत्पादनात घट येणार आहे..परभणी व हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ४ आणि ५ डिसेंबर रोजी १० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होते. उर्वरित २९ दिवस किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. कमाल तापमान २७ ते २९ अंश सेल्शिअस दरम्यान राहिले..Jowar Cold wave impact: शिरोळ तालुक्यात थंडीमुळे ज्वारी बियाणेच उगवेना.ज्वारीच्या उगवणीसाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तर वाढीसाठी २० ते २८ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते.१० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यास पिकांची वाढ मंदावते. .Cold Wave Impact: सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुक्याचे प्रमाण वाढले .परभणी जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीची ९७ हजार ४६४ पैकी ८५हजार ५१८ हेक्टर (८७.७४ टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ९ हजार ५६७ असतांना १६ हजार ६२ हेक्टर (१६७.८८ टक्के) पेरणी झाली आहे..यंदा ज्वारी पिकाच्या वाढीच्या काळात जास्त थंडी पडली. कमी तापमानाचा परिणाम ज्वारी पिकाच्या वाढीवर होतो. यंदा पोषक वातावरण नसल्यामुळे ज्वारीचे धान्य आणि कडब्याच्या उत्पादनात घट येईल.डॉ.प्रीतम भुतडा, कृषिविद्यावेत्ता, ज्वार संशोधन केंद्र, वनामकृवि, परभणी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.