Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या (सीएससी) माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक आणि बनावटगिरी रोखण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुमारे ६०० केंद्रांचे आयडी (आयडी) तात्पुरत्या स्वरूपात लॉक करण्यात आले असून, आता या केंद्र चालकांची पडताळणी केली जाणार आहे..अनेक ठिकाणी अधिकृत परवाना नसतानाही ‘आपले सरकार’ सेवा केंद्राचे बनावट आयडी आणि बॅनर लावून केंद्र चालविले जात असल्याचे समोर आले आहे. हे बनावट केंद्र चालक शासकीय योजनांचे अर्ज भरण्यासाठी नागरिकांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. .CSC Center : सामुदायिक सुविधा केंद्रांमधील व्यावसायिक संधी .या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने गेल्या एक वर्षात सुरू झालेल्या सर्व केंद्रांची चौकशी सुरू केली आहे. ज्या केंद्र चालकांचे आयडी लॉक झाले आहेत, त्यांना आता पुन्हा केंद्र सुरू करण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यात चारित्र्य पडताळणी, केंद्राबाहेर लावलेला अधिकृत सेवांचा बॅनर आणि केंद्रातील संगणक प्रणालीसह आतील फोटो तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड आणि केंद्राचा अधिकृत आयडी क्रमांक आणि गाव, तालुका आणि जिल्ह्याची अचूक माहिती अर्जासोबत जोडावी लागणार आहे..Agriculture Office Locked: तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप .नागरिकांची गैरसोयपॅनकार्ड, पीकविमा, विविध दाखले आणि विमा योजनांसाठी ही केंद्रे महत्त्वाची असतात. मात्र एकाच वेळी ६०० केंद्रे बंद झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आता आपली कामे करण्यासाठी दुसऱ्या गावी किंवा लांबच्या केंद्रावर जावे लागत आहे. या केंद्रांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण व्हायला किती वेळ लागेल, या बाबत अद्याप स्पष्टता नाही..एक वर्षाच्या सीएससी केंद्र चालकांच्या आयडीची पडताळणी केली जात आहे. बॅनर, आतील फोटो आणि चारित्र्य पडताळणीची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.- सोमेश भोसले, सहायक व्यवस्थापक, सीएससी केंद्र.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.