Palghar News: विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागात पारंपरिक पिकांबरोबरच नगदी पिकांच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. विशेषतः उन्हाळी हंगामात चांगला बाजारभाव मिळणाऱ्या कलिंगड पिकाची लागवड आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र तालुक्यातील विविध गावांमध्ये पाहायला मिळत आहे. .विक्रमगड तालुक्यातील कुंर्झे, आलोंडे, मलवाडा, आपटी, भोपोली, सातखोर, दादडे, झडपोली या गावांतील अनेक शेतकऱ्यांनी यंदा मल्चिंग तंत्रज्ञानावर आधारित कलिंगड पिकाची लागवड केली आहे. .Watermelon Crop: आगाप कलिंगडास फटका; लागवड सुरूच.पाणी बचत, तण नियंत्रण व उत्पादनात वाढ यासाठी मल्चिंगचा वापर केला जात असून या आधुनिक पद्धतीमुळे पिकाची वाढ जोमदार झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. ठिबक सिंचन, नियोजनबद्ध खत व्यवस्थापन व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कीड नियंत्रण केल्यामुळे पीक सध्या चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे..GM Crop Technology: ‘जीएम’ तंत्रज्ञानाबाबत सरकारला मर्यादा: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान.सुधािरत वाणकुंर्झे (दुमाडपाडा) येथील शेतकरी विनोद चंदू भिमरा यांनी आपल्या आठ एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केली असून, दर्जेदार उत्पादनासाठी नामांकित कंपन्यांच्या सुधारित वाणांची निवड केली आहे. .या वाणांना चांगली फळधारणा, आकर्षक आकार, गडद रंग व गोड चव असल्याने बाजारात मोठी मागणी असते. त्याचबरोबर रोगप्रतिकारक क्षमता व उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.