Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : अकोल्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरू करा

Crop Damage Survey in Akola : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला, पातूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात काही भागात अतिवृष्टी सदृश पाऊस पडला.

Team Agrowon

Akola News : जिल्ह्यात अतिवृष्टी, सततचा पाऊस व नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांचीही पडझड झाली आहे. या नुकसानीचे पीकविमा कंपनी, कृषी विभाग व महसूल यंत्रणेने तातडीने सर्वेक्षण सुरू करावे, अशी सूचना खासदार अनुप धोत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

खासदार धोत्रे यांनी म्हणाले आहे, की गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोला, पातूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात काही भागात अतिवृष्टी सदृश पाऊस पडला.

या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला. पाऊस व पुरामुळे नागरिकांच्या घराच्या पडझडीसह खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीसंदर्भात जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे तक्रार नोंदविली आहे.

मात्र, काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे तक्रार नोंदविण्यास अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा मोबदला व शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी नुकसानीचे सर्वेक्षण तत्काळ करून शासनास अहवाल पाठविणे अत्यंत आवश्‍यक आहे.

अतिवृष्टी, सततचा पाऊस व नदीच्या पुराने जिल्ह्यातील घरांची पडझड व खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पीकविमा कंपनी, कृषी विभाग व महसूल विभागामार्फत तत्काळ सर्वेक्षण करण्यात यावे, असे खासदार धोत्रे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT