Lumpy Skin Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : पोळा सणालाच मोखाड्यात जनावरांवर ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Animals Affected by Lumpy Skin Worry Farmers on Pola Festival Day : रोगामुळे मोखाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा खरा सोबती म्हणून त्यांची जनावरेच राहिली आहेत.

Team Agrowon

Mokhada News : ग्रामीण भागात आजही जनावरांच्या मदतीनेच शेती केली जाते. खरिपाच्या हंगामात त्यांनी उत्तम साथ दिल्याने पोळा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्याची पारंपरिक प्रथा मोखाडा तालुक्यात आहे, मात्र ऐन पोळा सणाला जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात दिसून येत आहे. त्यामुळे मोखाड्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा खरा सोबती म्हणून त्यांची जनावरेच राहिली आहेत.

तालुक्यातील मोखाडा, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी एप्रिल, मेमध्येजनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. आता तालुक्यातील काही गाव-पाड्यांमधील जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे कळते आहे. या ठिकाणी तातडीने जनावरांचे लसीकरण करण्यास सुरुवात येणार आहे. - डाॅ. सचिन भालचिम, तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा

यंदा शेतीची कामे विना अडथळ्याने झाली. त्यामुळे मोखाड्यातील शेतकरी आनंदी झाला आहे. त्यामुळे यंदाचा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले होते, मात्र पोळा सणालाच अनेक ठिकाणच्या जनावरांवर लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे पोळा सणावर लम्पीचे सावट निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

खोडाळा भागातील वेगवेगळ्या गाव- पाड्यांमध्ये जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. वाघ्याचीवाडी येथील देवराम कामडी, लक्ष्मण झुगरे, रामा झुगरे, सायदे हट्टीपाडा येथील गंगा रेरे आणि वाळू पिंगळे यांसह अन्य शेतकऱ्यांची जनावरे लम्पीने बाधित झाली आहेत. हा आजार करोळ- पाचघर भागातील जनावरांवर होऊ लागला आहे. पशुवैद्यकीय विभागाने तातडीने या भागाचे सर्वेक्षण करून जनावरांना लसीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT