CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंच्या आश्वासनाला २४ तास होण्याआधीच इंद्रायणी पुन्हा फेसाळली

Indrayani River : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींच्या प्रस्थान सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहिले. तसेच त्यांनी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं वचन दिलं होतं. मात्र २४ तास होण्याआधीच इंद्रायणी पुन्हा फेसाळली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान आळंदी येथून शनिवारी (ता.२९) झाले. यावेळी जय हरी विठ्ठलाच्या जय घोषात मानाच्या ४८ दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ केल्या. यावेळी संपूर्ण अलंकापुरी दुमदुमली होती. तर या पालखी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. याचवेळी शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले होते. तसेच राज्यातील वारकऱ्यांची आपल्याला काळजी असून इंद्रायणीच्या प्रदूषणाचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाला २४ तासही होत नाही तोच इंद्रायणी रविवारी (ता.३०) पुन्हा फेसाळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट आणि त्यांचे आश्वासन फक्त वेळ मारून नेण्यासाठी होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांच शनिवारी प्रस्थान झाले. तर आज पुण्यात दोन्ही पालख्यांचे मनोमिलन होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून कडक बदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीतील गांधीवाडा आजोळघरी पहिला मुक्काम पडला.

यादरम्यान आळंदीत पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. त्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी पालखी प्रस्थानावेळी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचं आश्वासन वारकऱ्यांना दिलं होतं. तसेच इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही शिंदे यांनी म्हटलं होतं. पण आता नदीत पुन्हा एकदा फेस दिसत असल्याने मुख्यमंत्री आळंदीत होते तोपर्यंतच प्रशासन अलर्ट होतं का? असा सवाल आळंदीतील सर्वसामान्य नागरीक करत आहेत.

शनिवारी मुख्यमंत्र्यांनी इंद्रायणी नदीची पाहणी केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर नदीवर २४ तास निरीक्षण सुरू ठेवण्यात आले आहे. नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.

मात्र काही तासांच्या आतच नदीत फेस जमा झाला आहे. त्यामुळे सध्या प्रशासनाकडून फेसावर केमीकलचा मारा केला जात आहे. प्रदुषणावर कायमस्वरूपी तोडगा न काढता फक्त मलमपट्टी करण्याचे काम प्रशासन करत असल्याचे उघड झाले आहे. तर शिंदे यांनी वारकऱ्यांना दिलेले इंद्रायणी प्रदुषणमुक्तीचे आश्वासन हवेत विरल्याच बोलले जात आहे.

सहा ‘सीओं’ना नोटिसा

इंद्रायणी नदीच्या प्रदुषणावरून कारवाई न करता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सहा ‘सीओं’ना नोटिसा बजावल्या आहेत. एमपीसीबीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आळंदीसह पाच नगरपालिका, दोन नगरपंचायती व एका कटक मंडळावर नदी प्रदूषणाचे खापर फोडले आहे. तर प्रदुषणाला जबाबदार धरत सर्व संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

मंडळाने आळंदी, लोणावळा, तळेगाव दाभाडे (नगर परिषद) देहू-देहू गाव, वडगाव (नगरपंचायती) आणि देहू रोड (कटक मंडळ) संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीसचे उत्तर देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर पाण्याच्या गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करावे असे सांगण्यात आले आहे. तसेच सांडपाणी वाहिन्यांचे जाळे तयार करावेत असेही आदेश एमपीसीबीने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

Vidarbha Rain : पावसामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक बंद

Desi Cow Conservation : सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गोवंश पालनास महत्त्व

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

SCROLL FOR NEXT