Jayen Mehta Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Dairy Sector: भारत जगाचे दुग्धव्यवसाय केंद्र बनेल: जयेन मेहता

Jayen Mehta: दूध हे भारतातील सर्वांत मोठे कृषिपीक असून, देश जागतिक उत्पादनात २५% वाटा उचलतो. अमूलचे जयेन मेहता यांनी राष्ट्रीय डेअरी अधिवेशनात भारताचे जागतिक दुग्धव्यवसाय केंद्र होण्याचे चित्र स्पष्ट केले.

मुकुंद पिंगळे

Gujrat News: भारताला गहू, तांदूळ या अन्नधान्यांचा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून आपण मानतो. मात्र दूध हे भारतातील सर्वांत मोठे कृषिपीक आहे. जागतिक उत्पादनात देशाचा २५ टक्के वाटा आहे. सर्वाधिक दूध उत्पादन येथे घेतले जात असून २०३३ पर्यंत हे उत्पादन ३० टक्क्यांवर जाणार आहे.

मात्र या नाशवंत उत्पादनात व्यावसायिक दृष्टिकोन, मूल्यवर्धनाच्या विविध संधी व मूल्य साखळीच्या माध्यमातून भारत जगाचे दुग्धव्यवसाय केंद्र बनेल, असा विश्वास गुजरात सरकारी दूध विपणन महासंघ(अमूल)चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी व्यक्त केला.

सहकार भारती आयोजित राष्ट्रीय डेअरी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात ‘मूल्यवर्धनातून गावांच्या व पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ’ या विषयावर मेहता यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जागतिक स्तरावरील दूध उत्पादनाच्या अनुषंगाने अमूल समूहाने निर्माण केलेल्या व्यावसायिक संधी व विस्तार याबाबत वाटचाल सांगितली.

मेहता म्हणाले, की ‘ऑपरेशन फ्लड’अंतर्गत भारत जगातील सर्वांत मोठा दूध उत्पादक देश बनला, ही महत्त्वपूर्ण दूधक्रांती मानली जाते. यामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. २०२४ मध्ये जगभरात ९६८ दशलक्ष टन दूध उत्पादन होते.यामध्ये भारताचे उत्पादन २३९ दशलक्ष टन म्हणजेच जागतिक उत्पादनात २५ टक्के वाटा आहे. यामध्ये संघटित क्षेत्रात ५० दशलक्ष टन उत्पादन होते. त्यात अमूल १२ दशलक्ष टन उत्पादन घेत सातत्य ठेवले आहे.

सात दशकांपूर्वी स्थानिक शेतकरी व पशुपालकांच्या माध्यमातून दूधक्रांतीचा महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला. त्यामुळेच ६० हून अधिक देशात दूध उत्पादकांच्या मालकी असलेल्या संघाची २०० हून उत्पादने निर्यात होतात. अमेरिकेसारख्या देशात अमोल हा राष्ट्रीय ब्रँड बनला आहे, ही मोठी कामगिरी आहे.

‘श्वेतक्रांती २.० ला पुढे नेण्याची गरज’

सहकारी चळवळीच्या माध्यमातून दूध उत्पादक, ग्रामस्तरीय सहकारी दूध संघ, जिल्हा सहकारी दूध संघ, राज्य सहकारी दुग्ध विपणन महासंघ व ग्राहक अशा पाच स्तरांवर कामकाज केले जाते. ग्राहकांची मागणी, आरोग्यवर्धक गुणधर्म यांची सांगड घालून नावीन्यपूर्ण उत्पादने तयार केली आहे. सतत विकास हेच ध्येय आहे. अलीकडे बायोइथेनॉल संबंधित संशोधन व विकास प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सहकारी दूध संघाची संख्या २ लाखांवरून ४ लाखांवर न्यावी लागेल. त्यासाठी श्वेतक्रांती २.० ला पुढे नेण्याची गरज असल्याचे जयेन मेहता यांनी आवाहन केले.

‘गुणवत्ता व अन्नसुरक्षेकडे लक्ष महत्त्वाचे ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासह ग्रामविकास साधण्यासाठी दुग्धव्यवसाय महत्त्वाचा आहे. दूध उत्पादनात जगभरात अव्वल आहोत. मात्र गुणवत्ता व अन्नसुरक्षेकडे लक्ष द्यावे लागेल.अनेक ठिकाणी दूध भेसळ वाढती असल्याची खंत इंडियन डेअरी असोसिएशन पत्र पाठवा पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ. जे. बी. प्रजापती यांनी व्यक्त केली.

‘पारदर्शक व्यवस्थापनातून दूध उत्पादकांचा विकास’

‘चुकीचे व्यवस्थापन व भ्रष्टाचारामुळे मोठ्या अडचणी होत्या. मी दूध संघाचा कुठलाही खर्च घेत नाही. मनुष्यबळ सोबत वापरत नाही. पारदर्शक व्यवस्थापन आणल्याने दूध उत्पादक शेतकऱ्याचा विकास शक्य आहे,’ असे प्रतिपादन जळगाव जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगे चव्हाण यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Nutrients: पीकवाढीसाठी गंधक, कॅल्शिअम, मॅग्नेशिअमचे महत्त्व

Oilseed Sowing: तेलबिया पेरणी स्थिर; सूर्यफूल पेरा रखडला

Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेमागील पायाभूत तंत्रज्ञान

Turmeric Quality: जानेफळ येथे हळद गुणवत्ता सुधार विषयावर प्रशिक्षण

Livestock Shed Management: आधुनिक तंत्रज्ञानातून गोठ्याचे स्मार्ट व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT