NDDB Dairy Project : मदर डेअरीअंतर्गत एनडीडीबी देणार दूध उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन

Mother Dairy : दूध खरेदी आणि बाजारातील अंतर कमी करण्यासाठी दूध उत्पादक कंपन्यांना दुधाचे पदार्थ विक्री करता यावेत, यासाठी मदर डेअरी माध्यमातून प्रोत्साहन दिलं जात असल्याचं शाह म्हणाले.
NDDB Dairy Project
NDDB Dairy ProjectAgrowon
Published on
Updated on

NDDB Milk : राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ अर्थात एनडीडीबीकडून दूध उत्पादक कंपन्यांना 'फॉरवर्ड लिंकेजस' उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखली जात असल्याची माहिती एनडीडीबीचे अध्यक्ष मनीष शाह यांनी बिझनेस लाईन या वृत्तपत्राला दिली आहे. दूध खरेदी आणि बाजारातील अंतर कमी करण्यासाठी मदर डेअरीच्या अंतर्गत प्रोत्साहन दिलं जात असल्याचं शाह म्हणाले.

देशात दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एनडीडीबीकडून पावलं उचलली जात आहेत. दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीला प्रक्रिया उद्योगाच्या अभावी खिळ बसलेली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना किफायतशीर दर मिळत नाही. परिणामी दूध उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज असल्याचं जाणकार सांगतात.

NDDB Dairy Project
Amit Shah at NDDB : दुग्ध उत्पादकांसाठी अमित शहा यांची मोठी घोषणा; दोन लाख नवीन कृषी पतसंस्था स्थापन करणार

एनडीडीबीने अलीकडेच ओडिशा सरकारसोबत एक सामंजस्य करार केला आहे. यामध्ये दूध उत्पादक कंपन्यांना मदत करण्यात येत आहे. तसेच विविध राज्यातही मदर डेअरीच्या माध्यमातून दूध उत्पादक कंपन्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट एनडीडीबीने ठेवलं आहे.

बिझनेस लाईनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाह यांनी दूध क्षेत्रातून महिलांच्या विकासवर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचं सांगितलं. शाह म्हणाले, महिला सशक्तिकरणाच्या दृष्टीने, एनडीडीबीच्या २३ दूध उत्पादक कंपन्यामध्ये ७५टक्के सदस्य महिला आहेत. त्यापैकी काही दूध उत्पादक कंपन्यांना मदर डेअरी दूध ब्रॅंडअंतर्गत दूध विक्रीची संधी मिळाली आहे. तसेच मदर डेअरी त्यांच्याकडून संपूर्ण दूध खरेदी करण्याचं खात्री देत आहे." असंही शाह यांनी सांगितलं.

एनडीडीबीचे अध्यक्ष शाह यांनी दूध उत्पादक कंपन्यांना प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. तसेच दूध उत्पादक कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर झाल्यानंतर त्यांना त्यांच्या स्वत:च्या प्रक्रिया प्रकल्पाची स्थापन करण्यासाठी एनडीडीबीकडून प्रोत्साहित केलं जाईल, असंही शाह म्हणाले.

दूध खरेदी हाच दूध उत्पादक कंपन्यांना प्रमुख प्रकल्प आहे. मदर डेअरी बाजारातील एक प्रस्थापित ब्रॅंड आहे. त्यामुळे आम्ही दूध उत्पादक कंपन्यांना ताकद वापरुन बाजाराची चिंता न करता त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असल्याचं शाह यांनी सांगितलं.

दरम्यान, एनडीडीबीने आत्तापर्यंत साहज, बाणी, श्रीजा आणि पयास यासारख्या कंपन्यांशी दूध उत्पादक कंपन्यांच्यामार्फत भागीदारी केली आहे. या कंपन्या दूध उत्पादनाची विक्री मदर डेअरी ब्रॅंडच्या अंतर्गत करत आहेत. तसेच एनडीडीबीने राजस्थान, पंजाब आणि आंध्र प्रदेशमध्ये मदर डेअरीने विस्तार करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com