Dairy Revolution : शेतकऱ्यांनी बनासकंठाच्या वाळवंटात घडवली ‘दूधक्रांती’

Gujrat Cooperative Model : जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा संस्कृती उदयास येते आणि जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा क्रांती घडते.
Milk Revolution
Milk Revolution Agrowon
Published on
Updated on

Nashik News : बारमाही वाहणारी नदी नाही, सर्वत्र दुष्काळ असल्याने पाण्याचा प्रश्‍न अशी भीषण परिस्थिती. जमिनीत उपलब्ध होईल एवढेच पाणी, तेही ८०० ते ९०० फूट खोलीवर, अशा प्रतिकूल परिस्थितीत गुजरातमधील बनासकंठाच्या वाळवंटी प्रदेशात सहकार चळवळीने दिशा दिली.

जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा संस्कृती उदयास येते आणि जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा क्रांती घडते. यातून दुग्धक्रांती घडून बनासकंठा येथे आशिया खंडातील सर्वांत मोठा दुग्धप्रकल्प सहकारी चळवळीतून उभा राहिला, या शब्दात गुजरात विधानसभेचे अध्यक्ष व बनास जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष शंकर चौधरी यांनी यशोगाथा मांडली.

‘सहकार भारती’ आयोजित राष्ट्रीय डेअरी अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थित दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील भागधारकांना चौधरी यांनी संबोधित केले. या वेळी व्यासपीठावर नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष मनेष शाह, ‘सहकार भारती’चे राष्ट्रीय सरचिटणीस दीपक चौरसिया उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, की दूध न विकण्याची धारणा येथे आहे. मात्र सहकार चळवळीने या भागाचा कायापालट केला आहे. गलबाभाई पटेल यांनी १९६६ मध्ये स्वप्न पाहिले. सुरुवातीला १०० लिटर दूध संकलनापासून सुरू झालेला प्रवास आज सरासरी ५.७ दशलक्ष लिटरपर्यंत गेला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या माध्यमातून दररोज एक कोटी लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. वार्षिक उलाढाल आता २१ हजार कोटींवर गेली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत २४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात.

Milk Revolution
Dairy Farming: गोपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनावर भर

शेतकऱ्यांनी संघटित होऊन आज फक्त दूधक्रांती घडवली नाही. तर महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व दुधासोबत संधींचा शोध घेत घेऊन नवीन वाटचाल सुरू आहे. ‘मी नाही तर आम्ही’ ही भावना प्रत्येकाच्या रक्तात भिनली आहे.

पारदर्शक कारभार आणि प्रत्येक निर्णयात सभासदाला विचारात घेण्याची भूमिका असल्यानेच येथे विश्वास निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात औद्योगिकीकरणाला वाव नसल्याने सहकारी चळवळीच्या माध्यमातून व्यावसायिक संधी निर्माण झाल्या. या भागातील शेतकरी, महिला व युवकांचे अर्थकारण सक्षम होत आहे.

Milk Revolution
Dairy Farming : दुष्काळात संघर्षातून टिकविलेला दुग्ध व्यवसाय

शेणावर प्रक्रियेद्वारे बायोसीएनजी प्रकल्प

बनास जिल्हा दूध संघाने श्वेतक्रांती घडवली. आता येथे मधुक्रांती होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बटाटा प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी केली आहे. येथील प्रक्रियायुक्त बटाटा युरोपच्या बाजारपेठेत जातो. यासह शेंगदाणा व मोहरी तेलावर प्रक्रिया करून गुणवत्तापूर्ण खाद्यतेलाची निर्मिती केली जात आहे. गाईंच्या शेणावर प्रक्रिया करून ‘बायोसीएनजी’ प्रकल्प कार्यान्वित केला आहेत. गॅसवर आता शेतकऱ्यांच्या गाड्या धावत आहे. चार गाई असल्यास एक वाहन राहू शकते, असल्याचेही त्यांनी नमूद केले

शेतकऱ्यांची मुले ५० टक्के फी सवलतीत डॉक्टर

सामाजिक सेवांसाठी दूध संघाने गलबाभाई नानजीभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. या माध्यमातून दूध उत्पादकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत लिटर मागे दहा पैसे देणगी देण्याचा संकल्प केला. त्यातून ५० कोटी रुपयांचा निधी उभा राहिला. या पैशातून ‘बनास वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राची’ स्थापना करण्यात आली. येथे सभासद शेतकऱ्यांची मुले पन्नास टक्के फी सवलत घेऊन डॉक्टर बनत असल्याचा उल्लेख चौधरी यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com