Sugarcane Price agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Price : ऊस दरासाठी 'आंदोलन अंकुश'चे शिरोळ तहसील समोर बेमुदत धरणे आंदोलन

Dhanaji Chudmunge Shirol : सोमवार (ता. १६) डिसेंबरपासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी गुरूवार(ता.१२) जाहीर केले.

sandeep Shirguppe

Sugarcane Rate : शेतकऱ्यांना उसाचा परवडणारा दर मिळावा यासाठी मागील १५ दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. यापूर्वी दोन वेळा ऊसदर आणि इतर विषयांवर शिरोळ तहसीलदार यांच्या समोर बैठका झाल्या. त्यामध्ये ठरलेनुसार गुरूवारी (ता.१२) डिसेंबरपर्यंत सर्व मुद्यावर कार्यवाही करण्याचे कारखान्यांनी मान्य केले होते. पण त्याची अंमलबजावणी कारखान्यांकडून झालेली नाही. यासाठी सोमवार (ता. १६) डिसेंबरपासून शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी गुरूवार(ता.१२) जाहीर केले.

चुडमुंगे यांनी याबाबत शिरोळ तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, शिरोळ तहसीलदार कार्यालयात (ता.०५) डिसेंबर रोजी शिरोळ तहसील, शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या बैठकीत १३ डिसेंबरला पुढील बैठक ठेवण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून याबाबत कसलेही गांभीर्य न ठेवता साखर कारखानदारांना बैठकीचे पत्रच दिले नसल्याचे निवेदनात माहिती दिली आहे.

साखर कारखानदारांना पाठीशी घालण्यासाठी ही बैठक होत नाही. यामुळे आंदोलन अंकुशला नाईलाजास्तव पुन्हा आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे धनाजी चुडमुंग यांनी सांगितले.

आंदोलनाच्या प्रमुख मागण्या

मागील गळीत हंगामातील २०० तर यंदाच्या गळीत हंगामातील पहिली उचल ३ हजार ७०० मिळावी.

क्रमपाळी सार्वजनिक करून त्यानुसार भागातील ऊस प्राधान्याने तोडावा.

जानेवारी अखेर लावण आणि फेब्रुवारी अखेर खोडवा तोड व्हावी असे गावनिहाय वेळापत्रक तयार करून ऊस तोड करावी.

वाहन चालकांच्या खुशाली बाबत परिपत्रक काढून सर्व मुकादम वाहनधारक आणि मशीन मालक यांना नोटीस लागू करावी.

या मुद्यांच्या पूर्ततेसाठी हे बेमुदत धरणे आंदोलन शिरोळ तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक १६ डिसेंबर २०२४ पासून होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhavantar Yojana : भावांतराचे घोडे अडते कुठे?

Microfinance Loan Crisis : मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्जवाटपाला घरघर

Maratha Reservation : राज्यातील अडीच कोटी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या

Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांचा सन्मान करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Rain Crop Damage : जुलै मधील अतिवृष्टीमुळे ६० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT