Summer Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Farming : उन्‍हाळी शेतीकडे वाढता कल

Summer Farming Update : हेटवणे धरणाच्या पाण्यामुळे येथील असंख्य शेतकऱ्यांनी उन्हाळी दुबार भातशेती पिकवली असून ती आता हिरवीगार बहरली आहे.

Team Agrowon

Pen News : हेटवणे धरणाच्या पाण्यामुळे येथील असंख्य शेतकऱ्यांनी उन्हाळी दुबार भातशेती पिकवली असून ती आता हिरवीगार बहरली आहे. उन्हाळ्यातील दुबार भातशेतीला कीड, रोग, पूर, अतिवृष्टीपासून धोका नसल्‍याने ती सुरक्षित असल्‍याचे सांगण्यात येत आहे.

रायगड जिल्हा हा पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता. मात्र वाढत असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे येथील शेतकरी आता शेतीपासून दूर जात आहे. मात्र काही जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी दुबार शेती पिकाकडे वळले आहेत.

हेटवणे धरणाच्या कालव्यातून अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जात असल्याने पूर्व भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीबरोबर भाजीपाला, वेलवर्गीय अशा विविध पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ‍

धरणातील कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत कामार्ली, तळवली, आधारने, सापोली, शेणे, बोरगाव यासह काही खारेपाट भागातील शेतकरी सध्या उन्हाळी भातशेती आणि भाजीपाला पिकवत आहेत.

कृषी विभागाच्या अंतर्गत ६ हजार ६६८ हेक्टर क्षेत्रांपैकी १ हजार ७०० ते १ हजार ८०० हेक्टर भातशेतीची उन्हाळ्यात लागवड करण्यात येत आहे. पावसाळ्यातील शेतीपेक्षा उन्हाळ्यातील भातशेती फायद्याची ठरत असल्‍याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT