Mula And Khadakwasla Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Mula And Khadakwasla Dam: मुळासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधारा; २४ तासात पाण्याची मोठी आवक

Mula And Khadakwasla Dam Rain Update : राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यादरम्यान अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या बहुतांश भागातही चांगला पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या मुळासह खडकवासला धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune/Ahmednagar News : राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये सुरू असणाऱ्या दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर विविध जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान पुण्यासह अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या मुळासह खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस

पुणे शहराला खडकवासलासह धरण साखळीतील चारही धरणांच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. यंदा चारही धरणातील पाण्याची पातळी घटली होती. त्यामुळे पुणेकरांचे सर्व लक्ष वरूण राज्याकडे लागले होते. यादरम्यान गेल्या चार दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडल्याने बुधवारपर्यंत (ता.२४) ६९.५३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ज्यामुळे पुणेकरांची पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा होतो. बुधवारी पहाटे साडेतीन वाजता खडकवासला धरण १०० टक्के भरले. त्यानंतर धरणातून मुळा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीपात्रालगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. टेमघर २.१२ टीएमसी (५७.२७), वरसगाव टीएमसी ८.०४ (६२.७४), पानशेत ८.१३ टीएमसी (७६.३१)खडकवासला १.९७ टीएमसी (१००) असे चारही धरणात २०.२७ टीएमसी (६९.५३) पाणीसाठा झाला आहे.

तसेच मुळाधरणात हंगामातील सर्वाधिक आवक

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे असणाऱ्या मुळाधरणात देखील बुधवारी हंगामातील सर्वाधिक आवक झाली. २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळाधरणात बुधवारी सायंकाळी सहा वाजता १११३५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. त्यात २५८२८ क्युसेक कोतूळ येथील आवक झाल्याचे नगर पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी ही माहिती दिली. तर मागिल २४ तासात धरणात तब्बल पाऊण टीएमसी पाणी जमा झाल्याचे कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले.

यावेळी कोतुळ येथून लहित खुर्द येथील जलमापन केंद्रावर १६ हजार ७५० क्युसेक पाण्याची आवक झाल्याची नोंद झाली. ती दुपारी २४४५२ क्युसेक पाण्याची आवक झाली. तर हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस झाल्यास मुळा धरण दोन दिवसात निम्मे भरण्याची शक्यता असल्याचेही कार्यकारी अभियंता पाटील यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT