Mula Dam : मुळा धरणात पाण्याची आवक वाढली

Nagar Rain Update : शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांची व शेतीची तहान भागवणाऱ्या मुळा धरणात शुक्रवारी (ता. २१) सकाळी ७ हजार ६६७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
Mula Dam
Mula DamAgrowon
Published on
Updated on

Nagar News : शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांची व शेतीची तहान भागवणाऱ्या मुळा धरणात शुक्रवारी (ता. २१) सकाळी ७ हजार ६६७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.

धरणात २६ टीएमसी क्षमतेच्या मुळा धरणात पावणेबारा टीएमसी (४५.५६ टक्के) साठा झाला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस नसला तरी मुळा धरणामध्ये पाण्याची आवक होत असल्याने शेतकऱ्यात समाधान आहे.

नगर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस नसल्यामुळे पेरणी धिम्या गतीने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अल्प पावसावरच पेरण्या, कापूस लागवड उरकली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस नसला तरी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील हरिश्‍चंद्रगड, कळसूबाई पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू आहे.

Mula Dam
Heavy Rain : नांदेड जिल्ह्यातील ३६, हिंगोलीतील ३ मंडलांत अतिवृष्टी

शुक्रवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत घाटघरला ११६, रतनवाडीला १३०, पांजरे येथे ५०, वाकी येथे ६७, भंडारदरा येथे ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हरिश्‍चंद्रगड परिसरात चांगला पाऊस सुरू असल्याने मुळा धरणात पाण्याची आवक होत असून मुळा धरणात ४५.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Mula Dam
Rain Forecast : पालघर, पुण्याच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

पाणलोटातील जोरदार पावसामुळे भंडारदरा, निळवंडे धरणातही पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. ११ टीएमसी क्षमतेच्या भंडारदरा धरणात ७४.२५ टक्के म्हणजे सव्वाआठ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

असा पाऊस सुरू राहिला तर भंडारदरा आठ दिवसांत भरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निळवंडेत ३५.८५ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील अन्य धरणात पाणीसाठा वाढलेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com