Radhanagari Dam Get Open : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. दरम्यान धरणाचे ४ स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. सकाळी १० वाजून ५ मिनीटांनी ६ नंबरचा दरवाजा उघडला यानंतर काही वेळाने ३, ४, आणि ५ नंबरचे असे ४ दरवाजे उघडले आहेत.
स्वयंचलीत ४ दरवाज्यातून ५ हजार ७१२ तर BOT पॉवर हाऊस मधून १ हजार ५०० क्युसेक्स असा एकूण ७ हजार २१२ क्युसेक्स इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. यामुळे पुढच्या ८ तासांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव, तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी, कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी, कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली, धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी, कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे, शाळी नदीवरील- येळाणे.
दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे व जरळी घटप्रभा नदीवरील- कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण ८३ बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा टीएमसीमध्ये
राधानगरी ८.२१, तुळशी २.९३, वारणा २९.९६, दूधगंगा 18.94 टीएमसी, कासारी 2.08 टीएमसी, कडवी २.५२, कुंभी २.०१, पाटगाव ३.३९, चिकोत्रा १.०१, चित्री १.८९, जंगमहट्टी १.२२, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.२४, सर्फनाला ०.४८ टीएमसी व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
कृष्णा नदी ४२ फुटांवर
कृष्णेच्या पातळीत २४ तासांत दोन फुटांनी वाढ झाली. तर तालुक्यातील पंचगंगा, दूधगंगा, वारणा नद्यांच्या पातळीत वाढ सुरू आहे. शिरोळ तालुक्यात चारही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. कृष्णा नदीची सध्या ४२ फुटांच्या पुढे पाणी पातळी असून राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकात विसर्ग होत आहे. कृष्णा नदीची इशारा पातळी ५२ फुटांवर असून धोका पातळी ५८ फुटांवर आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.