Coriander Rate agrowon
ॲग्रो विशेष

Coriander Rate : कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन, एका पेंडीला ५० रुपयांचा दर

Price Of Coriander Leaves : कोथिंबीर पेंडीचा दर पुन्हा ५० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. कांद्याची वरचढ या आठवड्यातही पाहायला मिळत आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Market Vegetables : पावसामुळे भाजीपाल्याची आवक पुन्हा एकदा विस्कळीत झाल आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ पहायला मिळत आहे. उतरलेला कोथिंबीर पेंडीचा दर पुन्हा ५० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. कांद्याची वरचढ या आठवड्यातही पाहायला मिळत आहे. दरात प्रतिकिलो १० ते १२ रुपयांची वाढ झाली आहे. लसूणाचे दरातही चांगली वाढ पहायला मिळत आहे.

पहिल्या पावसात लागण केलेल्या भुईमुगाच्या बाजारात उपलब्ध होत असल्याने त्याची आवक चांगलीच सुरू झाली आहे. तर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दराने विक्री सुरू आहे. फळबाजारात मागणी आणि आवकही ठप्प आहे. केळीचे दर अद्याप ५० रुपयांच्या पुढे आहेत तर इलायची केळीची आवक वाढली आहे. पपई आवक घसरली आहे. पेरुची आवक सुधारली आहे. फूलबाजारात झेंडूचे दर कोमजलेलेच आहेत. ऐन सणासुदीत झेंडूची अवस्था अशीच राहिली तर दराचा बाजारच होण्याची शक्यता आहे, मात्र पडलेले निशिगंध, शेवंतीचे दर भाव खात आहेत.

भाजीपाला : टोमॅटो- २० ते २५, दोडका- ६० ते ७०, वांगी -६० ते ८०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ३० ते ४०, मिरची - ६० ते ७०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते ३०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ५० ते ५५, लसूण- ३५० ते ४००, आले- १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ६०० शेकडा, गाजर - ४० ते ५०, बीन्स- ५० ते ६०, गवार - १०० ते १२०, भेंडी- ६० ते ८०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ३० ते ४०, कोथिंबीर - ४५ ते ५०, मेथी - २५ ते ३०, अन्य भाज्या - १५ ते २० पेंढी, शेवगा - ५ ते ७ रुपये नग.

फुले : झेंडू - ५० ते ६०, निशिगंध - २५० ते ३००, गुलाब - २५०, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - २०० ते २२०.

फळे : सफरचंद - २२० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- २०० ते २५०, चिकू- १०० ते १२०, पेरु- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ - १५० ते २००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - १००ते १२० डझन, किवी - १६० तर २००, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.

खाद्यतेल : सरकी - ११५ ते ११८, शेंगतेल - १८० ते १८५, सोयाबीन - ११२ ते ११५, पामतेल - १०८ ते ११२, सूर्यफूल - ११३ ते ११८.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ९५ ते ९७, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ -११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२ , उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा- ९०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०५ ते ११५, मसुर- ७० ते ७५, फुटाणाडाळ - ११० ते १५५, चवळी- १०० ते १३०, हिरवा वाटाणा- १७५, छोला -१२० ते १५०.

मासेमारीला ब्रेक; आवक नाही

सध्या समुद्रातील वाऱ्यांचा मारा यामुळे मासेमारी करण्यास मच्छीमार धजावत नाहीत. त्यामुळे आता नारळी पौर्णिमेनंतरही समुद्र माशांची मच्छीबाजारात प्रतीक्षा आहे. दुसरीकडे पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी माशांची आवक कमी आहे. परिणामी दर वाढले असून, किलोला १० ते १५ टक्‍क्यांची वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

Solapur Assembly Election Result : सोलापूर जिल्ह्यात भाजपची सरशी

Maharashtra Vidhansabha Election Result : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश

BJP Dominance : महाराष्ट्रावरील भाजपची मांड पक्की

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT