Fungal Diseases on Cashew : काजू बागांवर बुरशीजन्य रोगाचा मारा, कृषी शास्त्रज्ञांची भेट

Cashew Kolhapur : आजरा तालुक्यातील काजू बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
Fungal Diseases on Cashew
Fungal Diseases on Cashewagrowon
Published on
Updated on

Fungal Diseases on Cashew Kolhapur : आजरा तालुक्यातील काजू बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. काही झाडांची मर झाली आहे. याबाबत 'सकाळ' माध्यम समुहाने काजू बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान झाल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबत तातडीने कृषी महाविद्यालय, कोल्हापूरच्या कृषी शास्त्रज्ञांनी भेट दिली. काही काजू बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना उपाययोजनेबाबत माहिती दिली.

आजरा तालुक्यात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काजू बागांचे नुकसान झाले आहे. महिनाभर झालेला पाऊस व कुंद वातावरणामुळे काजू बागांमध्ये बुरशीजन्य रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला.

यामुळे काही झाडांची मर झाली आहे. काल(ता.२९) कृषी महाविद्यालयाचे कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अभयकुमार बागडे, रोगशास्त्र विभाग सहायक प्राध्यापक डॉ. रवींद्र कारंडे यांनी काजू बागांना भेट देऊन माहिती घेतली.

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सतत कोसळणाऱ्या पावसामुळे काजू बागांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. हा फांदी मर, पिंक मर (पांढरे चट्टे) बुरशीजन्य रोग आहे.

या काळात हवेत मोठ्या प्रमाणात आर्द्रता होती. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव वेगाने झाला आहे. बागेतील रोपांची मर झाली असून फांद्या वाळल्या आहेत. यामुळे सुमारे दहा ते पंधरा टक्के काजू उत्पादनात घट होणार आहे.

Fungal Diseases on Cashew
Gokul Milk Kolhapur : पशू महाविद्यालयाच्या मुद्दावरून 'गोकुळ'ची सभा गाजणार? शौमिका महाडिकांची सत्ताधाऱ्यांवर आगपाखड

यापूर्वी २०१६-१७ मध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता. बुरशी नियंत्रक औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व झाडांना बुरशीजन्य औषधाची फवारणी व जमिनीत आळवणी केली तेथे अशा प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही.’ प्रदीप माळी, विजयसिंह दळवी, वैभव जौंदाळ उपस्थित होते.

काजू बाग व्यवस्थापनाबाबत अनास्था

काजू बागांचे व्यवस्थापन दरवर्षी केले गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी काजू बागांची उन्हाळ्यात स्वच्छता करण्याबरोबरच बुरशी नियंत्रक औषधांची फवारणी गरजेचे आहे. असे केल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. याबाबत शेतकऱ्यांत अनास्था आहे. याबाबत जनजागृती व प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे डॉ. अभयकुमार बागडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com