Maharashtra Soybean Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Sowing : सोयाबीनच्या पेऱ्यात २० हजार हेक्टरने वाढ

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात ३ लाख ५९ हजार ८७ हेक्टरवर (९९.४६ टक्के) पेरणी झाली. यंदाच्या पेरणी क्षेत्रात फक्त सोयाबीनचे क्षेत्र ७७.३७ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात २० हजार ४१९ हेक्टरने वाढ झाली आहे.

यंदा कपाशी, मूग, तूर, उडीद, ज्वारीच्या क्षेत्रातील घट कायम आहे. कृषी व महसूल विभागाकडून नुकतेच यंदाच्या खरिपाचे पेरणी क्षेत्र अंतिम करण्यात आले. त्यानुसार यंदा जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ६१ हजार ५४ हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ लाख ५९ हजार ८७ हेक्टरवर (९९.४६ टक्के) पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

गतवर्षीच्या (२०२२) तुलनेत यंदा खरिपाच्या क्षेत्रात १२ हजार ६५१ हेक्टरने वाढ झाली. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र २ लाख ५६ हजार ४०४ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ७७ हजार ८४४ हेक्टरवर (१०८.३६ टक्के) पेरणी झाली. कपाशीची ३८ हजार ८२१ हेक्टर पैकी ३१ हजार ३४७ हेक्टरवर (८०.७५ टक्के) लागवड झाली.

तुरीची ४३ हजार ३०६ पैकी ३२ हजार २६६ हेक्टर (७५.६३ टक्के), मुगाची ७ हजार ७८१ पैकी ५ हजार ७०१ हेक्टर (७३.२६ टक्के), उडदाची ५ हजार ८७९ पैकी ४ हजार ५१० हेक्टर (७६.७१ टक्के) पेरणी झाली. ज्वारीची ५ हजार ५०३ पैकी ३ हजार २६७ हेक्टरवर (५९.३४ टक्के), बाजरीची १९ हेक्टर, मक्याची १ हजार २१८ पैकी ४५९ हेक्टरवर (३७.६६ टक्के) पेरणी झाली. हिंगोली, कळमनुरी, वसमत तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त, तर औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पेरणी झाली.

खरीप २०२३ तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

हिंगोली ७७१४४ ७७७८१ १००.८३

कळमनुरी ६९१२१ ७०१५१ १०१.४९

वसमत ६३८७२ ६६५८६ १०४.२५

औंढा नागनाथ ६५०१३ ५९१८८ ९१.०४

सेनगाव ८५९०२ ८५३८१ ९९.३९

तुलनात्मक पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)

पीक २०२२ २०२३

सोयाबीन २५७४२५ २७७८४४

कपाशी ३२१५९ ३१३४७

तूर ३८४१० ३४२६६

मूग ६७५८ ५७०१

उडीद ५८४२ ४५१०

ज्वारी ४१६७ ३२६७

बाजरी २५२ १९

मका ५२९ ४५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT