Pune News: अवैध सावकारीच्या त्रासाला कंटाळून एका शेतकऱ्याने मागील आठवड्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली. पातूर तालुक्यातील बेलुरा खुर्द येथील शेतकरी गोपाल वामनराव पाटेखेडे यांनी बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर) सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गोपाल यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सावकारांकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार मांडली होती..आत्महत्येपूर्वीचा व्हिडीओया व्हिडीओत गोपाल म्हणतात की, सावकाराचे घेतलेले सर्व पैसे मी परत दिले आहेत, तरीही तो अजून पैसे असल्याचा दबाव टाकत आहे. त्याने माझे शेत आपल्या नावावर करून घेतले आणि शेत परत देणार नाही अशी सतत धमकी देत आहे..Farmer Death: मराठवाड्यात ३०० दिवसांत ८९९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या.तसेच शेत विकून टाकतो असेही तो म्हणतोय. पण जर शेतच राहिले नाही तर माझ्या लेकरासाठी शेती कुठून आणू, असा प्रश्न या व्हिडीओतून करत गोपालने शेतीसंबंधी काळजी व्यक्त करून अंततः त्याने आत्महत्या केली..Farmer Death: पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बार्शीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या.सावकाराच्या आर्थिक दबावातून आत्महत्याविशेष म्हणजे, या प्रकरणी पातूर पोलिसात तब्बल नऊ दिवसांनी गुन्हा नोंद झाला आहे. या तक्रारीत गोपालने आत्महत्येपूर्वी तयार केलेला व्हिडिओतून सावकार राकेश भोपेंद्र गांधी व सचिन उर्फ बंटी अरुण खरक यांच्यावर २० टक्के व्याजदराने घेतलेल्या रकमेची परतफेड झाल्यानंतरही जबरदस्तीने आणखी ८ लाखांची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे..मृत शेतकऱ्याच्या भावाने काय म्हटलेदरम्यान, यावर मृत शेतकऱ्याचा मोठा भाऊ नागेश पाटेखेडे म्हणाले की, सावकारांनी जबरदस्तीने आणि धमकी देत जमिन स्वतच्या नावे करुन घेतली. तसेच रक्कम परत केल्यानंतरही धमक्या सुरू होत्या, ज्यामुळे गोपाल नैराश्येत गेला होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.