Nanded News : जिल्ह्यात खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. आजपर्यंत सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९७ टक्क्यांनुसार सात लाख ४४ हजार ९०९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वाधिक चार लाख ३३ हजार ८८५ हेक्टरवर सोयाबीन तर दोन लाख दोन हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्र कोरडे गेल्याने खरिपातील पेरण्यांना उशीर झाला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. परंतु हा पाऊस सर्वदूर नसल्याने ठरावीक भागातच पाऊस झाला होता. यानंतर मात्र पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने सर्वत्र पेरण्यांना सुरुवात झाली.
पाऊस लांबल्याने यंदा मात्र ज्वारी, उडीद तसेच मुगाचा पेरा घटला आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९७ टक्क्यांनुसार सात लाख ४४ हजार ९०९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या १२३ टक्क्यानुसार चार लाख ३३ हजार ८८५ हेक्टरवर सोयाबीन तर सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ८४ टक्क्यांनुसार दोन लाख दोन हजार ३५९ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.
सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९५ टक्क्यांनुसार ६४ हजार हेक्टरवर तूर, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ५५ टक्क्यांनुसार १५ हजार हेक्टरवर मूग, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ४८ टक्क्यांनुसार ४८ हजार हेक्टरवर उडीद, सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या २५ टक्क्यांनुसार ११ हजार हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली आहे.
जिल्ह्यात बुधवारपर्यंत झालेली पेरणी
(क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक पेरणी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी
ज्वारी ४४,७४० ११,४८९ २५.९८
मका ८२३ ८५४ १०३.७७
तूर ६७,४२३ ६४,५६६ ९५.७६
मूग २७,३९२ १५,०२० ५४.८३
उडीद २९,६२५ १४,२५५ ४८.१२
सोयाबीन ३,५३,३१४ ४,३३,८८५ १२२.८०
कपाशी २,४१,२८२ २,०२,३५९ ८३.८०
एकूण ७,४१,८०९ ७,४४,९०९ .९७.१४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.