Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Farming : आधुनिक तंत्र वापरुन भात उत्पादनात वाढ

Paddy Crop : रिळ (ता.जि. रत्नागिरी) येथील शेतकरी कुटुंबातील मिलिंद वैद्य यांनी भातशेतीतून व्यावसायिकता रूढ केली आहे. भाताचे अधिकाधिक उत्पादन घेऊन त्यातून अर्थार्जन कसे करता येईल यावर भर दिला आहे.

Team Agrowon

शेतकरी ः मिलिंद दिनकर वैद्य
गाव ः रिळ, ता. जि. रत्नागिरी
भात क्षेत्र ः १५० गुंठे

Rice production : रिळ (ता.जि. रत्नागिरी) येथील शेतकरी कुटुंबातील मिलिंद वैद्य यांनी भातशेतीतून व्यावसायिकता रूढ केली आहे. भाताचे अधिकाधिक उत्पादन घेऊन त्यातून अर्थार्जन कसे करता येईल यावर भर दिला आहे. मिलिंद यांनी १९९२ पासून घरच्या भात शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला वडिलोपार्जित ४० गुंठ्यांवर पारंपरिक पद्धतीने घरच्या वापरापुरतेच भाताचे उत्पादन घेत होते. भात कापणी झाल्यानंतर भाजीपाला लागवड केली जायची. त्यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर घरखर्चासाठी केला जाई. पुढे भातलागवडीसाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याचे ठरविले. विविध प्रयोगशील शेतकरी आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना भेटून चर्चा केली. त्यानंतर सगुणा (एस.आर.टी.) पद्धतीने भात लागवडीस सुरुवात केली. दरवर्षी तिथी बघून पेरणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या ‘उत्कृष्ट शेतकरी’ या राज्यस्तरीय पुरस्काराचे ते मानकरी आहेत.

रोपवाटिका नियोजन ः
- भात लागवडीसाठी १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार रोपवाटिकेसाठी निवडलेल्या जमिनीची स्वच्छता करून घेतली. पॉवर टिलरने शेत चांगले नांगरून घेतले.
- नांगरणीपूर्वी जमिनीत ५०० किलो चांगले कुजलेले शेणखत प्रति दीड गुंठे क्षेत्र याप्रमाणे दिले.
- या वर्षी लागवडीसाठी पारंपरिक पटणी, कुडा आणि रत्नागिरी ८ या वाणांची निवड केली आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांस बीजप्रक्रिया करून घेतली.
- बीजप्रक्रिया केल्यानंतर बियाणे वाळवून घेतले. पेरणीपूर्वी १ दिवस आधी गोमूत्र, पाणी, मीठ आणि वारुळाची माती एकत्र करून बियाणे त्यात मिसळले. दरवर्षी याप्रमाणेच कार्यवाही करून नंतर बियाण्यांची थेट पेरणी केली जाते.
- साधारण ४ जूनला भात बियाणे पेरणी केली. एक गुंठा क्षेत्रास ४ किलो प्रमाणे बियाणे लागले. अशी साधारणपणे १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली.
- यंदा जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस होता. परंतु अधूनमधून पडलेल्या हलक्या सरींमुळे रोपवाटिकातील बियाणे रुजण्यास मदत झाली. फक्त कातळावरील रोपवाटिकांना पाणी द्यावे लागले.

पुनर्लागवड नियोजन ः
- बियाणे पेरणीनंतर रोपांची चांगली वाढ होईपर्यंत पुनर्लागवडीसाठी निवडलेले क्षेत्र तयार केले जाते.
- भात रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी ट्रॅक्टरच्या साह्याने जमिनीची उभी-आडवी अशी ८ वेळा नांगरणी करून घेतली. योग्यप्रकारे नांगरणी केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो.
- नांगरणी केल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत ४०० किलो प्रति गुंठा आणि मोहोटचा पाला टाकून घेतला. नांगरणी करताना मोहोटाच्या पाला टाकला जातो. मोहोटाच्या पाल्यामुळे हिरवळीचे खत तयार होते.
- त्यानंतर पत्री पेंड १ किलो, एरंड पेंड २ किलो, नीम पेंड २ किलो एकत्र करून जमिनीत खत म्हणून टाकले जाईल. त्यानंतर पॉवर टिलरच्या साह्याने योग्यप्रकारे चिखलणी करून घेतली.
- या वर्षी जूनच्या अखेरीस चांगल्या पावसाला सुरुवात झाली. साधारण २२ जूनला पुनर्लागवडीस सुरुवात केली. संपूर्ण १५० गुंठे क्षेत्रावरील लागवडीची कामे ४ जुलैपर्यंत सुरू होती. पावसाचा अंदाज घेऊन लावणीच्या कामे करण्यात आली.
- दोन रोपांत १५ बाय २५ सेंमी अंतर ठेवून सगुणा पद्धतीने लागवड केली आहे.
- लावणीनंतर २० दिवसांनी डीएपी खत दीड किलो प्रति गुंठे प्रमाणे मात्रा दिली.
- कुडा जातीच्या भात लागवडीमध्ये फक्त सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. त्यानुसार पेंड, गांडूळ खताचा वापर केला जाईल.

आगामी नियोजन ः
- बदलत्या हवामानानुसार कीड-रोगांचा पिकावर प्रादुर्भाव होतो. प्रामुख्याने मावा, तुडतुडे या किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाची वेळोवेळी पाहणी केली जाईल. आवश्यकतेनुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.
- रोपांची वाढ चांगली होण्यासाठी युरिया खताचा दुसरा डोस दिला जाईल.
- सततच्या पावसामुळे पिकांत तणांचा प्रादुर्भाव वाढतो. साधारण गणेशोस्तवादरम्यान तण नियंत्रण केले जाईल.
--------------
- मिलिंद वैद्य, ९४२१२३३८४८
(शब्दांकन ः राजेश कळंबटे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT