Forest Encroachment: वनजमिनीवर अतिक्रमणकर्त्यांवर फौजदारी

Forest Protection: मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमणकर्त्यांवर बोराखेडी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वनविभागाकडून स्वतंत्रपणे वन गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.
Forest Encroachment
Forest EncroachmentAgrowon
Published on
Updated on

Buldhana News: मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील वनजमिनीवरील अतिक्रमणकर्त्यांवर बोराखेडी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वनविभागाकडून स्वतंत्रपणे वन गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई नियमानुसार व कायद्याच्या चौकटीत पार पडल्याची माहिती उपवनसंरक्षक सरोज गवस यांनी दिली आहे.

मोताळा वनपरिक्षेत्रातील मोहेगाव, राजुर वनपरिमंडळ, पूर्व खैरखेड बिटअंतर्गत वनखंड क्रमांक ३२३ मधील अतिक्रमण हटविण्यासाठी वनविभाग, पोलिस, महसूल अधिकारी व राज्य राखीव पोलिस दलाच्या उपस्थितीत २३ जुलै रोजी कारवाई सुरू असताना अतिक्रमणधारकांनी मोठ्या गटाने एकत्र येत कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला चढवला होता.

Forest Encroachment
Forest Encroachment : वन क्षेत्रातील पिकांचे अतिक्रमण काढण्याची कारवाई

अचानक १०० ते १५० जणांच्या जमावाने दगडफेक, मिरची पावडर फेकणे, तसेच काठ्या, कुऱ्हाडी व कोयत्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात वनविभागाचे पाच (२ महिला, ३ पुरुष), पोलिस विभागाचे आठ (६ महिला, २ पुरुष) व राज्य राखीव पोलिस दलातील एक जवान गंभीर जखमी झाले. 

अतिक्रमण हटविण्यासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीचे मोठे नुकसान करण्यात आले, तर सहायक वनसंरक्षकांच्या बोलेरो वाहनावर हल्ला करून त्याची तोडफोड करत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.या जमिनीबाबत संबंधित अतिक्रमणधारकांनी शेतीसाठी वनहक्क दावे केले होते.

Forest Encroachment
Forest Land Encroachment : अतिक्रमणाचा प्रश्‍न सुटण्याची आशा

मात्र जिल्हा वनहक्क समितीने २०२२ व नंतर पुनर्विलोकनानंतर २०२४ मध्येही हे दावे नामंजूर केले होते. यानंतर सहायक वनसंरक्षकांनी जानेवारी ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान अतिक्रमणधारकांना कार्यालयात पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. सुनावणी झाल्यानंतर आणि सर्व दृष्टिकोनाचा विचार करून अतिक्रमण निष्कासनाचे आदेश जारी करण्यात आले होते.

वनविभाग आणि पोलिसांची संयुक्तपणे कारवाई

ही कारवाई करण्यापूर्वी अतिक्रमणधारकांना वैयक्तिक नोटीस व १५ दिवसांचा इशारा देण्यात आला होता. ९ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत ४००.०८७ हेक्टर वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले. नंतर त्या जागेवर जलसंधारणाची कामे व वृक्ष लागवडीचा प्रस्ताव हाती घेण्यात आला. मात्र, ३० जून रोजी अतिक्रमणधारकांनी ट्रॅक्टर, टेम्पोंच्या साह्याने नव्याने त्या ठिकाणी घरे व झोपड्या उभारल्या.

जलसंधारणाची कामे बुजविण्यात आली आणि नव्याने अवैध वृक्षतोडही करण्यात आली. ११ जुलै रोजी पुन्हा त्यांना हटविण्यास सांगण्यात आले असता त्यांनी नकार दिला. या सगळ्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर वनविभाग व पोलिसांनी संयुक्तपणे कडक कारवाई करीत अतिक्रमणधारकांवर बोराखेडी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय वनगुन्ह्याची नोंदही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com