Kharif 2025: मराठवाड्यात ४८ लाख हेक्टरवर खरीप पेरा 

Marathwada Agriculture: मराठवाड्यात सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४८ लाख ३ हजार ६९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र अद्याप पेरणीविना रिकामे आहे.
Kharif 2025
Kharif 2025Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यात सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४८ लाख ३ हजार ६९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र अद्याप पेरणीविना रिकामे आहे. 

यंदा मराठवाड्यात सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२८.१० हेक्टर वर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ९६.५९ टक्के म्हणजे सुमारे ४८ लाख ३ हजार ६९.८५ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. 

Kharif 2025
Kharif Sowing 2025: सोयाबीन, कापूस, तुरीची पेरणी कमी; मक्याच्या लागवडीत मोठी वाढ

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील पेरणी झालेल्या वीस लाख ५९ हजार ३९०.९० हेक्टर तसेच लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांतील पेरणी झालेल्या २७ लाख ४३ हजार ६७८.९५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा समावेश आहे. मेच्या शेवटी जूनच्या सुरुवातीला पावसाच्या दमदार हजेरीमुळे अनेकांनी पेरणी लगबगीने आटोपली.

परंतु त्यानंतर पेरणी योग्य पावसाची वाट पाहण्यात दोन ते तीन आठवड्यापर्यंत पेरण्या लांबणीवर पडल्या. त्यामुळे पिकाचे विविध टप्पे आता दृष्टीस पडत आहेत. पहिल्यांदा पेरणी झालेली पिके चांगली असली तरी दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील पेरणी झालेली पिके मात्र अडचणीत असल्याची स्थिती आहे. 

Kharif 2025
Kharif Sowing 2025 : कापूस, तेलबिया, कडधान्य लागवडीखालील क्षेत्र पिछाडीवर; केंद्रीय कृषिमंत्रालयाचा अहवाल

२५ लाख हेक्टरवर सोयाबीन

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २५ लाख १५ हजार ५८४ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०९.४६ टक्के आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये लातूर विभागातील पाचही जिल्ह्यांत १९ लाख १९ हजार ५४५ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगर विभागातील तीनही जिल्ह्यांत पेरणी झालेल्या ५ लाख ९६ हजार ३९ हेक्टर सोयाबीन क्षेत्राचा समावेश आहे.

१२ लाख ५७ हजार हेक्टरवर कपाशी 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १४ लाख ७९ हजार ५३५ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात १२ लाख ५७ हजार २६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. लागवड झालेल्या क्षेत्रात लातूर विभागातील ४ लाख ३६ हजार ४१९ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगर विभागातील ८ लाख २० हजार ८४४ हेक्टर कपाशी क्षेत्राचा समावेश आहे.

Kharif 2025
Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

आढळून आलेले कीड-रोग 

मक्यावर लष्करी, पाने खाणारी अळी 

कपाशीवर मर, मावा, मूळकुज, हुमणी अळी 

सोयाबीनवर पाने खाणारी अळी

मुगावर रस शोषक किडी

उडदावर मावा, तुडतुडे, मर, खोडमाशी

जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टर)

छत्रपती संभाजीनगर ः ६,८०,२८४.७० 

जालना ः ६,३४,१७६.२० 

बीड ः ७,४४,९३० 

लातूर ः ५,८५,६४१.९० 

धाराशिव ः ५,५३,१५४.७० 

नांदेड ः ७,५३,६७२.०५ 

परभणी ः ४,९९,१८३.५० 

हिंगोली ः ३,५२,०२६.८०

पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टर) 

खरीप भात     १०७१.६०

खरीप ज्वारी     १३,८५३

बाजरी    ४०,७९२

खरीप मका     ३,५५,७५४

इतर तृणधान्य     १८३०.९०

तूर     ३,८७,३६०.१०

मूग     ८३,६२१.२४

उडीद     १,३१,५६९.६०

इतर कडधान्य     १२९१.२०

खरीप भुईमूग    १०,६६३.६०

तीळ     १२४७.४५

सूर्यफूल     २०

कारळे     ३०८.६०

इतर गळीत धान्य     ८३८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com